सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सुवर्णकन्येचे जल्लोषी स्वागत

सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सुवर्णकन्येचे जल्लोषी स्वागत
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 8/10/2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या ऋतुजा भोसले हिचे पुणे व सोलापूर जिल्ह्याची सरहद्द सराटी येथे तुतारी व हलगीच्या कडकडाटात व फटाक्यांची आतषबाजी करीत मोठ्या जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याची उत्तुंग कामगिरी केल्यानंतर ती प्रथमच अकलूजमध्ये आली. नीरा नदीवरील पुलावरून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत येताच तिचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दत्तात्रय भिलारे, सुर्यकांत शेंडगे, गणपत भोसले, विक्रम भोसले, अरविंद वाघमोडे, मारुती यादव, निशांत पाटील, राजेंद्र घोगरे, उत्तम भिलारे, यांचे सह असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर अकलूज शहरातून तिची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांनी मोठ्या उत्साहाने दुचाकी रॅली काढत मिरवणुकीत सहभाग घेतला.