सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये “सेफ्टी अँड सेल्फ डिफेन्स” ” या विषयावर व्याख्यान संपन्न

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये “सेफ्टी अँड सेल्फ डिफेन्स” ” या विषयावर व्याख्यान संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 05/12/2025 :
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर येथे निर्भया पथका अंतर्गत सध्याचे वाढते गुन्हेगारीचे प्रमाण व महिलांवरील होणारे अत्याचार हा विषय लक्षात घेता विद्यार्थिनींच्या व महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून “सेफ्टी अँड सेल्फ डिफेन्स” या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
दिनांक ४/१२/२०२५ रोजी संपन्न झालेल्या व्याख्यानास अकलूज निर्भया पथकाच्या टिमचे सहकारी ए. एस. आई. समाधान देशमुख, गोरवे व महिला कॉन्स्टेबल पिसे उपस्थित होते.
सदर व्याख्यानामध्ये ए.एस.आय. समाधान देशमुख यांनी विद्यार्थिनींना समाजामध्ये वावरताना आपल्या हातून चुका करण्याचे कसे टाळायचे याबद्दल माहिती दिली व त्यांनी पोलीस आपल्या संरक्षणासाठी कायम आपल्या सोबत आहेत असे सांगितले. विद्यार्थिनींना आपल्या सोबत काही अनुचित प्रकार घडत असल्यास निर्भया पथकास त्वरित संपर्क करण्याचे आवाहन केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. सुजाता रिसवडकर व सर्व महिला कर्मचारी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंकिता फडे यांनी केले. प्रा.भारती चंदनकर यांनी आभार मानले.
