संजय सूर्यकांत रणवरे यांचे हृदयविकाराने निधन

संजय सूर्यकांत रणवरे यांचे हृदयविकाराने निधन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 15/05/2024 :
निमसाखर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील प्रगतिशील शेतकरी आणि निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष पप्पू पाटील तथा संजय सूर्यकांत रणवरे (वय 55 वर्षे )यांचे दिनांक 15 मे 2024 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुली, तीन भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकराव मोहिते पाटील यांचे ते विश्वासु होते. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रात ते सक्रिय होते.
“अत्यंत सालस आणि मनमिळावू वृत्तीचे व्यक्तिमत्त्व लाभलेले आमचे सहकारी मित्र पप्पू पाटील अर्थात संजय सूर्यकांत रणवरे पाटील यांच्या अकस्मात निधनाने आम्हास अनपेक्षित धक्का बसला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना!” अशा शब्दात एन.यू.बी.सी. अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली चे महाराष्ट्र राज्य संपर्क व राज्य प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी श्रद्धांजली वाहिली.