सहाय्यक संचालक स्वप्निल देशमुख यांचा नागरी सत्कार संपन्न

सहाय्यक संचालक स्वप्निल देशमुख यांचा नागरी सत्कार संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 13/05/2025 :
इस्लामपूर (राजापूर) गावचे सुपुत्र स्वप्निल विलासराव देशमुख यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) घेण्यात आलेल्या परिक्षेमधून उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या सहाय्यक संचालक पदावर निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार जेष्ठ नेते मदनसिंह मोहिते-पाटील (सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती,अकलूज) यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी स्वप्निल देशमुख यांच्या सत्काराबरोबर आई सौ.बालिका देशमुख,वडील विलास देशमुख यांचाही सन्मान करण्यात आला.
मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले,मी सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना वस्तीशाळा मोठ्या प्रमाणात निर्माण करून वस्तीशाळांना बळकटी दिली.गुणवत्तेच्या आधारे शाळाचे मुल्यमापन चालू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाया अधिकच मजबूत होत गेला त्यावेळी निर्माम केलेल्या वस्तीशाळेतील विद्यार्थी हे स्वप्निल देशमुख युपीएससी परिक्षेमध्ये सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालय,भारत सरकार याच्या सहाय्यक संचालक पदावर निवड झाली याचे मला समाधान आहे. गतवर्षी स्वप्निल देशमुख भारत सरकारच्या तांत्रिक सहाय्यक पदी निवड झाल्याने त्याचा सन्मान माझ्या हातून करण्यात आला होता, तेव्हा स्वप्निल देशमुख यांनी दादा तुम्हाला पुन्हा एकदा सन्मानासाठी यावे लागणार आहे. असे आपल्या स्वप्नाला खुले आवाहन देणारी यश पदाकृंत करणारी युवक निर्माण झाले पाहिजेत.या नगरीमधील अनेक युवक विविध क्षेत्रामध्ये काम करीत असून आपले नाव कमवित आहेत.तथापी हे गाव अधिका-यांचे गाव झाले पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना स्वप्निल देशमुख म्हणाले माझे आई-वडील,भाऊ माने-देशमुख परिवारातील सदस्य, अप्तमित्र, नातेवाईक या सर्वांच्या सहकार्याने माझे कुलदैवत श्री.सिद्धनाथ, माता जोगेश्वरीच्या आशिर्वादाने अवघड परिक्षा सोपी झाली.मिळालेले प्रेम,आपुलकी आणि शुभाशिर्वाद माझ्या पुढील वाटचालीस नक्की अधिक प्रेरणादायी ठरतील.गावाच्या पवित्र मातीत माझे बालपण गेले येथे संभाजीबाबांचे दिव्य अस्तित्व आहे. या भूमितून सन्मानित होणं आणि श्री.सिद्धनाथ माता जोगेश्वरीच्या पुण्यनगरीमध्ये व साक्षीने मिळालेला हा सन्मान माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील. उद्योग मंत्रालयाच्या संबंधीत कोणत्याही प्रकारची काम असेल तर त्यांना नक्की मदत करेन. फुड प्रोसेसिंगमध्ये एखादा उद्योग गावामध्ये उभा राहत असल्यास त्याला माझे मोलाचे सहकार्य राहील.युपीएससीमध्ये अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनासाठी मी नेहमी उपलब्ध असेन,असे त्यांना आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.धनंजय देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास इस्लामपूर गावातील माजी सरपंच ह.भ.प.साहेबराव देशमुख,सोसायटी मा.चेअरमन रत्नशिव पवार,डॉ.सचिन देशमुख,माणिक देशमुख मा.तंटामुक्त अध्यक्ष, तुकाराम देशमुख पोलीस पाटील दगडू देशमुख ग्रा.सदस्य संजय देशमुख, महादेव देशमुख, अँड.अतुल देशमुख, नवनाथ देशमुख, दिलीपभाऊ देशमुख,अँड.राम देशमुखरामचंद्र देशमुखअकबरभाई शिकलगार, उदयकुमार देशमुख, विजयकुमार देशमुख, श्री.संतोष महामुनीगुरूजी, कपील देशमुख,धनाजी देशमुख, संजय बाबा देशमुख, रोहन देशमुख, हणमंत देशमुख,विकास देशमुख, सौ.रत्नप्रभा देशमुख,सौ.शोभा देशमुख,सौ.जयमाला देशमुख,सौ.रूपाली देशमुख,सौ.शारदा देशमुख,सौ.स्वाती देशमुख आदि ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रामणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार अँड.सतिश देशमुख(मुंबई हायकोर्ट) यांनी केले व सुत्रसंचालन श्री.रत्नशिव पवार यांनी केले.