ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 09/11/2025 :
घरात जर तुम्ही बारकाईने लक्ष दिले तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपली आई व वडील सतत कामात असतात असे तुमच्या लक्षात येईल. घरातील जबाबदाऱ्या घेऊन त्यांची नोकरी, व्यवसाय चालू ठेवतात.
सुट्टीच्या दिवशी पण त्यांची जास्तीची नियोजित कामे असतात. हे सर्व ते कुटुंबासाठी म्हणजे मुलाबाळांसाठी करत असतात. आपल्याला कोणती गोष्ट कमी पडू नये यासाठी ते प्रयत्नशील असतात. हे सर्व ते कर्तव्य भावनेने करतात.
मुलांनो, आपले पण काही कर्तव्य असले पाहिजे की नाही? चांगला अभ्यास, चांगली, संगत, चांगले विचार, चांगले संस्कार यासाठी एकही पैसा खर्च करावा लागत नाही. लागते ती आपली इच्छाशक्ती.
आपले व्यक्तिमत्व संस्कारी बनवू व आई-वडिलांना समाधान देऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

