1 डिसें.रोजी शंकरनगरला मोफत सर्वरोग निदान शिबीर
1 डिसें.रोजी शंकरनगरला मोफत सर्वरोग निदान शिबीर
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 29/11/2024 : माळशिरस तालुक्यातील
शंकरनगर ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर, मेडिकल असोसिएशन अकलूज,
यांचे संयुक्त विद्यमाने जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त व मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अमृतमोत्सवी वर्ष वाटचालीनिमित्त
मोफत सर्व रोगनिदान शिबीराचे आयोजन केल्याची माहिती शंकरनगर प्राथ. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.बी.आव्हाड यांनी दिली.
रविवार दि. ०१/१२/२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरनगर इथे मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन कृषी उत्पन बाजार समिती अकलूज चे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते व अकलूज येथील प्रसिध्द ह्रदयरोग तज्ञ डॉ. एम.के.इनामदार यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या शिबीरात मोफत आरोग्य तपासणी, उपचार, मधुमेह, उच्च रक्तदाब तापासणी व उपचार यासह बालरोग व कुपोषित बालके तपासणी व उपचार ,दंतरोग ,त्वचारोग , स्त्रिरोग व गरोदर स्त्रियांची सर्व तपासणी , नेत्र रोग व मोती बिंदु तपासणी व शस्त्रक्रियेसाठी निवड, अस्थिरोग तपासणी ,कान-नाक घसा तपासणी , इदयरोग आणि जनरल वैद्यकिय तपासणी , मानसोपचार ,जेष्ठ नागरीक तपासणी , जि.प. सोलापूर मार्फत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी व उपचार तसेच रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.
तरी इच्छुक रक्तदात्यांनी नाव नोंदणी करून प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरनगर येथे उपस्थितीत राहण्याचे अवाहन आयोजकांनी केले आहे.
त्याचप्रमाणे नागरीकांनीही आयोजीत केलेल्या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचीही विनंती केली आहे.