मनाची शुद्धता
मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 29/11/2024 :
नुकताच विधानसभेच्या निवडणूक झाल्या. निकाल लागले. कोणाच्या मनासारखे तर कोणाच्या मनाविरुध्द. त्यापूर्वी प्रचाराच्या रणधुमाळीत मतभेद झाले. नाती तुटली, मैत्री तुटली, घरे फुटली. आपली माणसे परकी झाली.
निकाला नंतर मात्र सत्ता स्थापनेसाठी त्यांची युती-आघाडी होईल. गळ्यात गळे घालतील, पक्षभेद विसरतील. ऊनी-दुणी काढलेली विसरतील. आपण तरी हे का धरून बसायचे? त्यांच्यासाठी आपली माणसे तोडायची?
आपण पण सर्व पक्षाचे राजकारण विसरून जाऊ. आपले कुटुंब, मित्रपरिवार, नातलग अन् सगेसोयरे एकीने राहू. आपली नाती सांभाळू. काही अडचण आली संकट आले तर आपली उपयोगी पडतील. ते कोणी येणार नाहीत.
*आजचा संकल्प
लोकशाही असलेल्या देशात निवडणुका येत राहणार. तेवढ्यापुरती मत मतांतरे होतील. इतरवेळी आपण एकाजिवाने व एकमताने राहू व परस्परातील ऐक्य टिकवू. समाजाच्या, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करत राहू.
सौ. स्नेहलता स. जगताप._