ताज्या घडामोडी

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ज्या बंगाल प्रांतातून संविधान सभेत निवडून गेले होते ते जिल्हे आज कुठे आहेत…?

संपादकीय पान………….✍️

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ज्या बंगाल प्रांतातून संविधान सभेत निवडून गेले होते ते जिल्हे आज कुठे आहेत…?

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/12/2024 : भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांनी संविधान निर्माण करण्याची अट घातली होती… त्यासाठी प्रतिनीधी म्हणून संविधान सभेत निवडणूक घेऊन संविधान सभेत जाण्यासाठी मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते… त्यातील एक मतदारसंघ होता “जैसोर आणि खुलना” मतदारसंघ… हा मतदारसंघ इतका खास का आहे याबद्दल थोडक्यात माहीती…

तत्कालीन परिस्तिथीत हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व काँग्रेस करत होती तर मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व मुस्लिम लीग करत होती त्यानंतर तिसरा राजकीय पक्ष म्हणून शेड्युल कास्ट फेडरेशन हा महत्वाचा घटक संविधान सभेच्या निवडणुकीसाठी सज्ज असतांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत येण्यासाठीच संविधान सभेचे दारच काय तर खिडक्या सुध्दा बंद करणारी काँग्रेस आणि सरदार पटेल यांची बदमाशी एका व्यक्तीच्या लक्षात आली ती व्यक्ती म्हणजे “जोगेंद्रनाथ मंडल…”
जोगेंद्रनाथ मंडल हे चांडाळ समाजाचे आणि मुस्लिम लिग या राजकीय पक्षाचे नेते होते… त्यांचा मतदारसंघ होता जैसोर आणि खुलना… पुणे करारानुसार हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ म्हणून जाहीर करण्यात आलेला होता… कारण तिथे चांडाळ समाजाची लोकसंख्या जास्त होती शिवाय मुस्लिम मतदार सुध्दा भरपूर होती… काँग्रेस ने बाबासाहेबांना संविधान सभेत पोहचूच नये यासाठी सर्व तयारी केलेली असतांना जोगेंद्रनाथ मंडल हे बाबासाहेबांकडे येतात आणि आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी निमंत्रित करतात… त्यावेळी बाबासाहेबांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतात… आणि दिलेल्या शब्दा प्रमाणे मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर शेड्युल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून बाबासाहेबांना संविधान सभेत निवडून पाठवितात…
1946 मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांसाठी दरवाजे आणि खिडक्या बंद करणारा सरदार पटेल आणि काँग्रेस डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत बघून चिडलेले होते… ऐनतेन कारणाने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवू नये यासाठीच 1947 मध्ये भारताच्या फाळणीची तयारी करतात… बॅरिस्टर जीना अगोदर पासूनच मुस्लिमांसाठी वेगळ्या राष्ट्राची मागणी करतच होते पण अचानक त्यांना मुस्लिम राष्ट्र देण्याची अवदसा काँग्रेसला सुचली यामागे एकमेव षडयंत्र म्हणजे संविधान सभेतून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना बाहेर काढणे…
त्यानुसार अगोदरपासून अशी मागणी होती की मुस्लिम बहुल जिल्हे पाकिस्तान मध्ये समाविष्ट करण्यात येणार आणि हिंदू बहुल जिल्हे हिंदूस्थानात सहभागी करण्यात येणार होते… त्यानुसार जैसोर आणि खुलना हे दोन्ही जिल्हे हिंदू बहुल असतांना सुद्धा ते दोन्ही जिल्हे पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आले याचे एकमेव कारण म्हणजे या दोन्ही जिल्ह्यातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेत निवडून आलेले होते… ते जिल्हे पाकिस्तान मध्ये समाविष्ट केल्याने आपोआप डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे पाकिस्तान च्या संविधान सभेचे सदस्य बनले….
त्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तडक लंडनला रवाना झाले आणि तत्कालीन इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांना सदरील चालबाजी सांगितली… एव्हाना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची कायदेतज्ज्ञ म्हणून जगभर ख्याती पोहचलेली होती… आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकरां इतका हुशार कायदेतज्ज्ञ त्यावेळेस कुणीही नव्हता… त्यासोबतच कायदामंत्री म्हणून इंग्रज सरकार मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केले होते ते सर्वांना परिचित होतेच… म्हणून तत्कालीन इंग्लंड चे प्रधानमंत्री यांनी भारताला स्वातंत्र्य हवे असेल तर डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत घ्यावे लागेल अशी अटच टाकली… म्हणून गांधी, नेहरु, पटेल आणि काँग्रेस ची मजबुरी झाली आणि त्यांनी बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा घेऊन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा निवडून आणावे लागले… आणि संविधान सभेत स्थानच नाही तर मसुदा समितीचे अध्यक्ष सुध्दा बनवावे लागले…
अशा पध्दतीने भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हेच कारणीभूत ठरले नसता अजूनही आम्ही इंग्रजांच्या गुलामीत खितपत पडलो असतो… ज्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेचे प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून पाकिस्तानची फाळणी केली ती वाया गेली… फाळणी केली म्हणून
म्हणून मिस्टर गांधीला आपला जीव गमवावा लागला…
त्याच पाकिस्तान चा विरोध करुन आज नथुराम समर्थक सत्तेत जाऊन बसले आहेत… यांचा पाकिस्तान विरोध हा फक्त राजकीय आहे नसता यांचे स्वप्न खरचं अखंड भारत निर्माण करायचा असता तर पाकिस्तानचा विरोध करण्यापेक्षा झालेली फाळणी रद्द करण्यासाठी यांनी पुढाकार घेतला असता… पण काँग्रेस मधील जहाल मतवादी बाहेर पडून आपलीच सत्ता कधी अबाधित राहील यासाठी त्यांनी अखंड भारत, पाकिस्तान, राष्ट्रवाद, हिंदुराष्ट्र असे मुद्दे जाणीवपूर्वक निर्माण केले… आणि सत्ता कधी मवाळ गटाच्या तर कधी जहाल गटाच्या हातात कशी राहील याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे… मग नाव काँग्रेस असले काय नी बीजेपी असले काय….! काय फरक पडतो…


आज जैसोर आणि खुलना मतदारसंघाचा नकाशा बघायला मिळाला म्हणून या मतदारसंघा विषयी थोडक्यात माहीती… धन्यवाद त्या जनतेला ज्यांनी महामानवाला निवडून दिले आणि बहुसंख्य हिंदू असतांना पाकिस्तानात आपले भविष्य चाचपडत आहेत… इतकी भयानक सजा काँग्रेस ने या मतदारसंघांतील जनतेला दिलेली आहे… त्यासाठी आपले मानावे तितके आभार कमीच आहेत…
नमो बुध्दाय जयभीम….

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button