मी सर्वांची लाल परी एस टी बोलतेय…

मी सर्वांची लाल परी एस टी बोलतेय…
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 2/11/2023 :
नमस्कार
जय महाराष्ट्र…
मी तुमच्या सगळ्यांची लाडकी एस टी बोलतीय. कुणी मला लालपरी कुणी लालडब्बा म्हणून ओळखतात.
माझ्या मनाची घालमेल, इडा पिडा, दुःख, व्यथा महाराष्ट्राला सांगण्याची इच्छा झाली .कारण तुमची माझी पिढ्या न पिढ्या प्रवासाची ओळख . सर्व सामान्य, गोरगरीब, अडाणी, अनाथ, दिनदुबळ्याची, विद्यार्थ्यांची माझी 75 वर्षांची ओळख. माझ्या सोबत प्रवास करून अनेकांची स्वप्न पूर्ण झालीत. अनेक पिढ्या घडल्या आहेत. अनेक शिक्षक डॉक्टर इंजिनिअर पत्रकार व्यापारी पोलिस फौजी यांना घडविण्यात माझा ही मोलाचं वाटा आहे. अनेकांच्या वैद्यकीय सेवा, देवदर्शन, सहल, दळणवळण, यात्रा माझ्या मुळे सोप्या झाल्या. अनेक प्रेमविरांचा प्रेमाची साक्ष मी आहे. माझा सीट मागील पत्र्यावर कोरलेली नावे आज ही माझा लक्षात आहेत. मी आज सर्व महिलांना 50% किमतीच्या तिकीट दराने प्रवास घडवते. वृध्द असो त्यांना मोफत प्रवास घडवते. आज जर मी बंद असेल तर इतर खाजगी वाहने गोरगरीब, दिनदुबळ्या जनतेची वारेमाप पैसे घेऊन लूट करतात. असो. परंतु कोणतेही प्रश्न असो सगळ्यात आघाडीवर मीच असते. परंतु मी जशे आपणास जवळचे मानते तशे आपण मला जवळचे समजत नाही याची खंत वाटते.
परंतु आज कोणत ही आंदोलन असो कोणताही राजकीय प्रश्न असो माझी जाळपोळ, माझी तोडफोड माझे नुकसान करता .यात मी कशी दोषी असते. मी तर निस्वार्थ भावनेने आपली सेवा करते. आपलेच भाऊ बहिण आई वडील नातेवाईक माझ्या सेवेचा आनंद घेतात आणि मग का बरं आपण माझे नुकसान करावे? मी ना कोणाचा समाज बघते ना कोणाची जात बघते. मी सगळ्यांना समान वागवते. मग तरी का हा दुटप्पी पणा माझ्या सोबत.
तुमचा सगळ्यांची जबाबदारी आहे माझी रक्षा करणे. कोणतेही आंदोलन, मोर्चे, बंद असुदेत तुमचा मागण्या माझी जाळपोळ तोडफोड केल्याने पूर्ण होतील का? याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे .मला सगळेच जाती धर्माचे लोक समान. मग का माझी जाळपोळ करता ? मी आपल्या सर्वांची आहे. मी गोरगरिबांची, दिन दुबळ्यांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, विध्यार्यांची, सर्वांची मनोभावे सेवा करते, करत राहील. सर्वांनी माझी रक्षा करा. एवढीच विनंती करते. तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा करते.
धन्यवाद! कळावे आपलीच
लालपरी.
अविनाश देशमुख
शेवगाव.
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार