ताज्या घडामोडी

सरकार ग्राहकांसाठी करते हा गोड गैरसमज व अर्धसत्य!

सरकार ग्राहकांसाठी करते हा गोड गैरसमज व अर्धसत्य!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/11/ 2024 : सरकार ग्राहकांसाठी करते हा गोड गैरसमज व अर्धसत्य! (साखर, कांदा, सोयाबीन, कापूस, दूध ….)
गेल्या 6 वर्षांत साखरेच्या साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) मध्ये केवळ 2 रु. वाढ झाली आहे. याउलट इतर वस्तूंच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत.
सरकार हे सर्व काही ग्राहकांसाठी करते हा एक गोड गैरसमज व अर्धसत्य आहे.
आमची मागणी साखरेला किमान विक्री किंमत रु 45 प्रती किलो करावी. ती नेहमी एफआरपी वाढीशी निगडित असावी. तसे केल्यास एका कुटुंबाला फक्त महिन्याला 70 रु. वाढ होईल.*ळ
पाकिस्तान मध्ये साखरेची किंमत आहे 150 रु./किलो, पण आपल्याकडे निर्यात बंदी आहे.
सरकारला काळजी आहे औद्योगिक प्रक्रिया व्यवसाय लॉबीची. जसे शीतपेये, औषधे, आईसक्रीम, बिस्कीट, केक, चॉकलेट, मिठाई वगैरे बनविणारे. या क्षेत्राचा साखरेचा खप तब्बल 83% आहे. ज्यांच्या कडून सरकारला निधी मिळतो.
तसेच जेव्हा जेव्हा साखरेचा MSP वाढवला जाईल तेव्हा इथेनॉलच्या किंमती त्यानुसार सुधारल्या जाव्यात. कारण इथेनॉलच्या किमती आणि साखरेच्या किमतीचे इष्टतम गुणोत्तर असते ज्याच्या वर, इथेनॉलचे उत्पादन करायचे की नाही हा आर्थिक निर्णय अवलंबून असतो.
वरील मागण्यांसाठी साखर कारखान्यांना आमचा पाठिंबा आहे.
शेतकऱ्यांना 6000 रु. पेक्षा जास्त एफआरपी मिळू शकते. जर ही त्रिसूत्री- साखरेला द्विस्तरीय भाव, इथेनॉल इफेक्ट व साखरेची किमान विक्री किंमत वाढ, झाली तर.
घरगुती वापरासाठी कांद्याचा खप फक्त 5% आहे. *त्याचा इतर 95% वापर हॉटेल्स, मसाले तयार करणारे निर्यातदार हेच करीत आहेत. सोयाबीनचा मानवी खाण्यासाठीचा खप फक्त 6% आहे. इतर वापर पशु खाद्य, ऑइल इंडस्ट्रिज, बायो डिझेल, हॉटेल्स प्रक्रिया करण्यासाठी वापरतात. कापूस तर कोणीच खात नाही. त्याच्यावर टेक्सटाईल व तेल उद्योगाचा दबाव आहे.
म्हणून आपल्या ह्या सर्व शेतमालाचे भाव पाडले जातात.
शेतकऱ्यांच्याच उत्पादन किंमती वर एवढे निर्बंध का? तिकडे औद्योगिक उत्पादक आपल्या उत्पादनावर भरमसाठ एमआरपी जाहीर करून ग्राहकांची लूट करतात. तिकडे कोणाचे लक्ष नाही. सोबत चा फोटो पहा.

एक उदा. टीव्ही ची एमआरपी आहे 70,990 रु. व प्रत्यक्ष विक्री 40,990 रु. फक्त.

सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे
अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518

Coordinator- Task Force Sugar Core Committee (समन्वयक, टास्क फोर्स शुगर कोअर कमिटी)

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button