ताज्या घडामोडी

वाढदिवसानिमित्त 75000/- रु.मदत करणारे शहाजी आण्णाप्पा सवदे

संपादकीय…..✍️

वाढदिवसानिमित्त 75000/- रु.मदत करणारे शहाजी आण्णाप्पा सवदे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 03/12/2023 :
शहाजी आण्णाप्पा सवदे यांनी आपल्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 75 हजार रुपये संकटात सापडलेल्या मेंढपाळास आर्थिक मदत देऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवल्याचे यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी सांगितले. मेंढपाळ श्री बिरू जोंग राहणार राशिवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या मेंढपाळांच्या बागेवाडी ता. जत येथे भटकंती करत मुक्कामी असणाऱ्या मेंढरांच्या कळपावर लांडग्याने हल्ला करून 32 मेंढरं ठार तर 22 मेंढरं बेपत्ता झाली होती. या मेंढपाळांचे जवळ जवळ चार ते पाच लाख रुपये आर्थिक नुकसान होऊन त्याच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता. यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी हल्ला झालेल्या ठिकाणी घटनास्थळावर जाऊन अधिकाऱ्यांच्या कडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामा करून सोशल मीडियात मेंढपाळ बिरू जोंग यास आर्थिक मदत करण्याबद्दल पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली होती अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त करून बिरुला आर्थिक मदतीचा हात दिला होता आणि खंबीरपणे सांगितले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
शहाजी आण्णाप्पा सवदे व सौ .रेखा शहाजी सवदे मूळ गांव- डफळापूर ता.जत जि. सांगली सद्या- पांचपाखाडी ठाणे. या दांपत्याच्या पर्यंत ही पोष्ट पोहचली… वाचली..आणि हळहळ व्यक्त केली. फक्त हळहळ व्यक्त केली नाही.. तर बिरू जोंगला कशा पद्धतीने आणि कशी मदत करता येईल याबाबत मनोमन विचार करून त्यांनी निर्धार केला. पक्के ठरवुन बिरू जोंग याला फोन केला. त्याला कसे झाले वगैरे सर्व विचारून घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. एक दिवस बिरूस फोन करून ठाण्याला घरी बोलावून घेतले त्यासाठी ट्रॅव्हल्स बुकिंग करून तिकीटे ही पाठवून दिली.बिरूस काहीही कल्पना दिली नव्हती. स्वतः सकाळी ट्रॅव्हल्स थांब्यावर आले. बिरुस आपल्या घरी घेऊन गेले. सकाळी अंघोळ,चहा, नाष्टा, नवीन कपडे घेऊन त्याला विहिंग स्पोर्टस क्लब वर्तकनगर रोड ठाणे येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन गेले. तेव्हा बिरू जोंगला कळाले की कोणता तरी कार्यक्रम आहे. तेव्हा शहाजी अण्णाप्पा सवदे यांनी या कार्यक्रमात आपल्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 75 हजार रुपयाची आर्थिक मदत या बिरू जोंग यांना केली. परंतु एवढी मदत करत असतानाही त्यांनी पाकिटात किती रकमेचा चेक आहे हे बिरूला व कार्यक्रम ठिकाणी असणाऱ्या पाहुणे मित्रमंडळींना याची कल्पना दिली नाही. असा हा अवलिया, सामाजिक कार्यकर्ते शहाजी आण्णाप्पा सवदे यांचे यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहे.
खरंतर अडचणीत सापडलेल्या मेंढपाळांना किंवा गरिबांना आर्थिक मदत करण्यापेक्षा त्यांची हेटाळणी करणारी जास्त भेटतात काहीजण तर म्हणतात कशाला एवढ्या लांब जायचं.. कशाला रानात राहायचं, मेंढरं कशाला पाळायची, कुठेतरी कामाला जायचं असे म्हणणाऱ्यांची तोंड मात्र 75 व्या वाढदिवसानिमित्त 75 हजार रुपये देणगी देऊन शहाजी आण्णाप्पा सवदे यांनी बंद करून त्यांनी एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करून समाजासमोर ठेवला. आणि नाव ठेवणाऱ्यांची तोंडही बंद केली. असा हा अवलिया आहे तरी कोण ? याविषयी थोडेसे सांगणे येथे क्रमप्राप्त आहे. शहाजी आण्णाप्पा सवदे हे मूळचे डफळापुर, तालुका जत, जिल्हा सांगली येथील मुळचे रहिवासी. नोकरी निमित्त ठाणे येथे स्थायिक झालेले. गरिबीतूनच दिवस काढलेले. त्यामुळे बीएमसीत अधिकारी होऊनही त्यांनी गरिबीचा मात्र विसर पडू दिला नाही. आपल्या पद्धतीने आपण समाजाला मदत करायला पाहिजे. जी परिस्थिती आपली होती. त्या परिस्थितीत अडकलेल्या आपल्या समाज बांधवांना काहीतरी मदत केली पाहिजे या भावना मनाशी ठेऊन ते समाजातील ज्यांना खरचं मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी खर्च करतात.. तसेच मित्र मंडळ, समाजातील नोकर वर्ग यांना एकत्र करून कै. शिवाजी बापू शेंडगे यांचा आदर्श घेऊन समाज मंडळ च्या माध्यमातून ही कार्यरत आहेत. गेल्या वर्षीही वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या सिध्दीला ही मंडळाच्या माध्यमातून ७० हजार रुपये मदत शिक्षणासाठी केली होती. अहिल्या जयंतीला अशाच घटनेसाठी वाळवा तालुक्यातील नागठाणे येथेही अशीच घटना घडली होती. तीही बातमी वाचून श्री पुजारी मेंढपाळास सवदे यांनी पुढाकार घेऊन मित्र परिवार यांच्या वर्गणीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती.
नोकरी लागताना त्यांच्या आजीने त्यांना सांगितलं होतं “बाबा रे ११ पगार तुला ठेव एक पगार मात्र समाजातील गोरगरीबांना मदतीसाठी कर! ” ही आठवण मात्र त्यांनी संजय वाघमोडे यांना फोनवर बोलताना सांगितली. खरं तर पाकिटात काय आहे ! हे बिरू जोगला ही माहिती नव्हतं. कार्यक्रम करून बिरू जोग ने घरी आल्यानंतर त्यालाही वाटलं काहीतरी असेल थोडी मदत आणि पाकीट खोलले तर पाकिटात 75 हजार रुपयांचा धनादेश होता. पाकिटातील धनादेश (चेक) आहे म्हटल्यानंतर त्याने संजय वाघमोडे (संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना) कोल्हापूर यांना फोन करून सांगितले. व म्हटले तुम्ही माझ्या पाठवलेल्या बातम्या आणि मदत करण्याबाबत लिहिलेली पोस्ट वाचून श्री सवदे साहेब यांनी मला फोन करून बोलून घेतले.मला काही सांगितलं नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने 75 हजार रुपये मला साहेबांनी मदत दिली आहे हे सांगितले. त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांनी
सवदे साहेबांच मनःपूर्वक अभिनंदन केले. जतचे संतोष वाघमोडे यांनीही बिरूला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. मेंढपाळाला मदतीचा हात देणाऱ्या या अवलियाला,सामाजिक कार्यकर्त्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभू दे , आणि त्यांचा आदर्श प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येक बांधवाने घेऊन दिनदुबळ्या समाजातील विद्यार्थ्यांना आणि गोरगरीब मेंढपाळांना अडचणीत सापडलेल्या गरजूंना मदतीचा हात द्यावा हीच अपेक्षा ! आम्ही साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता आणि akluj vaibhav.in यानिमित्ताने दानशूर व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करून धन्यवाद व्यक्त करीत आहोत.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button