ताज्या घडामोडी

गौरी गणपती पुढे साकारले बदलापूर घटनेसह महिलांवरील अत्याचाराचा देखावा

गौरी गणपती पुढे साकारला बदलापूर घटनेसह महिलांवरील अत्याचाराचा देखावा

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज

माळशिरस / तालुका प्रतिनिधी माळेवाडी अकलूज (ता.माळशिरस) येथील वेळापूर बीटच्या पर्यवेक्षिका स्मिता कदम यांनी गौरी गणपती पुढे बदलापूर घटनेसह महिलांवर होणाऱ्या आत्याचाराच्या घटनेवर देखावा सादर केला आहे. या त्यांच्या सामाजिक जागृतीच्या माध्यमातून समाजप्रबोधन केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
स्मिता कदम या विभाग वेळापूर येथे बाल विकास प्रकल्प विभागात त्या पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
गौरी गणपतीच्या देखाव्यानिमित्त कोलकत्ता महिला डॉक्टर वरील अत्याचाराची घटनेतून sexual harassment of a woman at workplace या कायद्याविषयी जनजागृती तसेच महिला विषयी संवेदनशीलतेची व सुरक्षिततेची भावना निर्माण करणे
बदलापूर घटना यातून POCSO कायदा. बालका विषयी सुरक्षा व संवेदनशीलतेची भावना निर्माण करणे.बालकांचे अधिकार
शाळांमधून बालकांना लैंगिक शिक्षणाची गरज.(Good touch ,Bad touch शाळा मधून मुली व मुलांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी कराटे, जुडो,लाठीकाठी याचे प्रशिक्षण याची गरज.
महिलांविषयी विविध अत्याचाराचे प्रकार. फक्त देवी नाही तर स्त्री म्हणून एक व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार. जीवन जगत असताना महिलेची विविध भूमिका व जबाबदारी. (Multitasking)
स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कायदा जनजागृती स्त्रियांवर होणारे विविध अत्याचार थांबवणे बाबत जनजागृती. राष्ट्रीय पोषण महा सप्टेंबर 2024 पोषण आहाराचे महत्व कडधान्य, विविध पालेभाजी व फळभाजी याचे महत्त्व.
एक पेड मा के नाम वृक्षारोपण जनजागृती त्या नेहमी करत असतात
यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी आस्मा आतार व जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उपळाई येथील वैद्यकीय अधिकारी डॉ धनराज कदम व ग्रामीण रुग्णालय करकंब येथील प्रीती नवगिरे यांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.