ताज्या घडामोडी

रानभाजी – सातपुती

रानभाजी – सातपुती
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/9// 2024 :
सातपुती ही वेलवर्गीय भाजी पावसाळ्यात येते. गोल, लांबट, शिराळ्या सारखीच पण टोकदार नसलेल्या ह्या भाजीला ७ शिरा असतात. ही भाजी शिराळी, घोसाळ्या प्रमाणे कडधान्ये, आमटीतही घालता येते.
तसेच नुसती भाजी केली तरी त्यात बटाटा, डाळी घालू शकता.
पाककृती
# साहित्य – १५ सातपुती, १ मोठा कांदा चिरुन, प्रत्येकी अर्धा चमचा राई, जिरं, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, १ चमचा मसाला अथवा अर्धा चमचा मिरची पूड, २ चमचे तेल, २ मोठे चमचे खवलेले ओले खोबरे, गरजे नुसार मिठ, अर्धा चमचा आलं लसुण पेस्ट (ऑप्शनल).
# कृती – सातपुती कापुन तुकडे करुन घ्या. भांड्यात तेल गरम करून त्यावर राई तडतडवून, जिरं टाकून त्यावर कांदा परतवा. कांदा बदामी रंगाचा झाला की त्यावर हिंग, हळद, मसाला, आलं लसुण पेस्ट घालून ढवळा. त्यात कापलेली सातपुती घाला व ढवळा. पाणी घालण्याची तशी आवश्यकता नसते. मध्यम आचेवर झाकणावर पाणी ठेवून भाजी शिजवत ठेवा. एक वाफ आली की त्यात मिठ घाला. मधून मधून ढवळत रहा. १० ते १५ मिनीटांत भाजी शिजते. मग त्यात खोबरे घालून परतवा. झाली भाजी तैय्यार.

संदर्भ : मायबोली
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.