“सहकारमहर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार” वितरण सोहळा संपन्न

“सहकारमहर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार” वितरण सोहळा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 15 जानेवारी 2025 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्काराचे वितरण माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. श्री विजय गणेशोत्सव ट्रस्टच्या या सोहळ्या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, शितलदेवी मोहिते पाटील, स्वरूपराणी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील यासह विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे सदस्य ॲड. नितीन खराडे-पाटील, सहकार महर्षि साखर कारखान्याचे कार्य. संचालक राजेंद्र चौगुले, सेक्रेटरी अभयसिंह माने-देशमुख, रघुनाथ माने, तुकाराम जाधव, वसुंधरा देवडीकर, संतोष माने, चंद्रकांत कुंभार, निवड समितीचे प्रा. विश्वनाथ आवड आदी उपस्थित होते.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रास्ताविकात श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या समाजोपयोगी कार्याचा आढावा घेतला.
या सोहळ्यात सहकारमहर्षि शंकरराव मोहिते-पाटील विशेष साहित्य पुरस्कार पानिपतकार विश्वास पाटील तर कथाकथनकार, कादंबरी लेखक अप्पासाहेब खोत आणि सोलापूर जिल्ह्यातील इतिहासाचे लेखन करणारे गोपाळराव देशमुख यांना साहित्यिक पुरस्कार तसेच यावर्षीपासून नव्याने सुरू केलेला माळशिरस तालुक्यातील साहित्यिक पुरस्कार परिसस्पर्श या चरित्र ग्रंथाचे लेखक प्रमोद जोशी यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी पानिपतकार विश्वास पाटील यांनी पानिपत हे मराठ्यांच्या पराभवाची नसून शौर्याची कथा असल्याचे सांगत नवीन येणाऱ्या पाच कादंबऱ्यांमधील मध्ये शिवाजी महाराजांच्या विविध मोहिमेचे यथार्थ वर्णन असल्याचे सांगितले.
यावेळी आप्पासाहेब खोत यांनी जगणं माणसाच्या हातात असतं जन्म आणि मरण हे हातात नसत मात्र काही माणसं जगणं सोन्यासारखे करत असतात महाराष्ट्रात सहकार महर्षि सरखी माणसं होऊन गेली त्यांच्या मुळेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झालाआहे. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण ऋणी असल्याची भावना व्यक्त केली. आभार प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी मानले.