ताज्या घडामोडी

मारुतीनाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालयात सखी सावित्री मंचाची स्थापना

मारुतीनाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालयात सखी सावित्री मंचाची स्थापना

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
माळशिरस प्रतिनिधी  : देशातील स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी महिलांच्या एकत्रीकरणाची गरज ओळखून माळशिरस मधील मारुतीनाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालय, माळशिरस मध्ये समारुतीनाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालय,सखी सावित्री मंचाची स्थापना करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरे तक्रार पेटी बसवून संस्थेने विद्यार्थी सुरक्षिततेसाठी अधिक दक्षता घेतलेली आहे संस्थेचे अध्यक्ष माधव मिराजदार , कार्याध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, कार्यवाहक रामभाऊ दोशी, सहकार्यवाहक ढाले सर्व संचालक याकडे अधिक लक्ष देत आहेत. विद्यालयात झालेल्या सभेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी समुपदेशक म्हणुन सीमा एकतपुरे यांनी मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता भारत पवार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले गुड टच बॅड टच हे विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे कृती करून त्यांना समजून सांगितले व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सभेसाठी असलेल्या उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपली ओळख करून दिली. यावेळी डॉक्टर डॉ. कविता पवार, समुपदेशक सीमा एकतपुरे, नगरसेविका रेश्मा टेळे, पोलीस पाटील शितल पाटील, अंगणवाडी सेविका सुजाता गोखले- गाडगीळ, उमा माने, मुख्याध्यापिका, कांबळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष, व्यवस्थापन समिती सचिव, शिक्षिका, पवार, लंके, शशिम शेख, देसाई सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थिनी आदी उपस्थित होत्या . सूत्रसंचालन पवार यांनी केले तर कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.