ताज्या घडामोडी

सेंद्रिय पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका नाही – डॉ. भारती भोसले

सेंद्रिय पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका नाही – डॉ. भारती भोसले

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 27 ऑगस्ट 2024 : अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबागेतील भाज्यांच्या पोषण तत्वांची माहिती या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयातील डॉक्टर भारती भोसले यांचे
आहारातील भाज्यांचे महत्त्व, भाज्यांची पोषण मूल्य व सेंद्रिय खत व कीटकनाशकाचा वापरून करून परसबागेत पिकवलेल्या भाज्या या आहारादृष्ट्या महत्त्वाच्या असतात या विषयावर मुलांसाठी व्याख्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले व उपप्राचार्य झाकीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितत संपन्न झाले.
शाळा व घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजे परसबाग होय. परसबाग करताना आपला हेतू असतो तो आपल्या रोजच्या खाण्यामध्ये आवश्यक असलेला भाजीपाला पिकवणे.
आयुष्यातील व शारीरिकदृष्ट्या जीवनसत्त्वाची आवश्यकता, महत्त्व याचीही माहिती दिली. परसबागेमूळे सांडपाण्याची विल्हेवाट, उत्पन्नात वाढ, वेळेचा सदुपयोग, स्वच्छ वातावरण निर्मिती, निरोगी आरोग्य, कुपोषणाला व रक्त कमतरतेला आळा, परसबागेमुळे घराची शोभा तर वाढते असे उपयोग आहेत. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून दिला जाऊ लागल्याने सकस आहार मिळाला त्यामुळे अध्ययन आणि अध्यापन ह्या दोन्ही गोष्टी सहज आणि सोप्या होतात. आपला भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र, आजच्या नव्या पिढीची नाळ शेतीशी जुळलेली नाही. त्यामुळे शिक्षणाकडून सेंद्रिय शेतीकडे हा उपक्रम राबवावा.
सदर व्याख्यानावेळी व्यवसाय विभागाचे उपप्राचार्य भारत शिंदे, विज्ञान विभागप्रमुख असिफ झारेकरी, संजय जाधव, हनुमंत जगदाळे सर, विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनुराधा निंबाळकर यांनी केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.