ताज्या घडामोडी

रानभाजी – तांदुळजा

रानभाजी – तांदुळजा

शास्त्रीय नाव : ॲमरँथस पॉलिगॅमस
कुळ : अ‍ॅमरँटेसी
स्थानिक नावे : चवळाई, चवराई, तांदुळजा
इंगजी नाव : ॲमरँथस

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/8//2024 : भारतात सर्वत्र आणि श्रीलंकेतील उष्ण देशांतील शेतांत तणासारखी व पसरट वाढणारी ही एक लहान, वर्षभर जगणारी व अनेक शाखांची औषधी आहे. ती पोकळा, माठ, राजगिरा यांच्या वंशातील असल्यामुळे त्यांची अनेक शारीरिक लक्षणे सारखी आहेत. पाने साधी, एका आड एक गोलसर, फुले सच्छदक, लहान, हिरवट, एकलिंगी असून डिसेंबर ते मार्च मध्ये पानांच्या बगलेतील कणिशात किंवा गुच्छात येतात. परिदले तीन आणि केसरदले सुटी व तीन. फळ शुष्क, बहुधा तडकणारे व करंडरूप असते. बी एक, बारीक व काळे. कोवळ्या फांद्या व पानांची भाजी करतात. रक्तपित्त, वात, ज्वर, कफ व प्रदर इत्यादींचे निवारण करणारे गुण या वनस्पतीत आहेत. तांदुळजा हीच एक उंच, मांसल, सरळ वाढणारी औषधी भारतात लागवडीत असून तिचे फळ तडकत नाही. तिची भाजी शीतक (थंडावा देणारी), दीपक (भूक वाढविणारी), वेदनाहारक व पथ्यकर असते.
पाककृती
# साहित्य : पालेभाजी १ जुडी, तेल, मोहरी, हिंग, हळद, लसणीच्या ४-५ पाकळ्या, लसूण पेस्ट, १-२ सुक्या लाल मिरच्या, भिजवलेली मूगडाळ पाव ते अर्धी वाटी, मीठ चवीनुसार.
# कृती : तांदुळजाच्या पाल्यातील पाने व कोवळी देठे निवडून घ्या. कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तडतडली की क्रमाने हिंग, हळद, लाल सुक्या मिरच्या, लसूण पाकळ्या किंवा लसूण पेस्ट घालून थोडे परता. भिजवलेली मूगडाळ घालून एखादे मिनिट परता. निवडलेली व स्वच्छ धुतलेली भाजी घालून आता ती खमंग परतून घ्या. तीन-चार मिनिटांतच भाजी शिजते. तरी आपापल्या आवडीनुसार भाजी कमी जास्त शिजवू शकता. चवीनुसार मीठ घाला व थोडे परतून गॅस बंद करा. रुचकर, पथ्यकर, पचायला हलकी अशी तांदुळजा पालेभाजी तयार आहे. ज्वारीची भाकरी किंवा पोळी बरोबर खायला ही भाजी छान आहे.

स्त्रोत: मराठी विश्वकोश/द.सी. चौगुले
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.