ताज्या घडामोडी

खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील

खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23 ऑगस्ट 2024 : असं म्हणतात की, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द बाळगणाराच इतिहास घडवतो. आदरणीय धैर्यशीलभैयांच्या बाबतीत हे वाक्य तंतोतंत लागू पडतं. भैयासाहेबांची वाटचाल ही मातीमध्ये उगवून आभाळाला स्पर्श करू पाहणाऱ्या महावृक्षासारखी आहे. भैयासाहेबांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभच मुळात अकलूजच्या उपसरपंच पदापासून झाला. पुढे जावून ते सरपंच झाले. गावपातळीवरचे प्रश्न त्यांनी मुळातून समजून घेतले. ते सोडवले. त्यासाठी गल्लीबोळातील कार्यकर्त्यांची मोट बांधली आणि त्यांच्यामध्ये समाजकार्याची प्रेरणा निर्माण केली. हीच प्रेरणा कार्यकर्त्यांच्या व्यक्तीमत्त्वा मध्ये उर्जास्त्रोतांसारखी साठून राहिली. भैसाहेबांच्या बरोबर काम केलेले कार्यकर्ते आजही भेटले तरी त्यांच्यामध्ये ही उर्जा जाणवते. पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम पाहताना साहेबांनी तालुका पातळीवरील प्रश्न हिरीरीने आणि कल्पकतेने सोडवले. पुढे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना जिल्हा पातळीवरील प्रश्न तडीस नेले. आभाळाएवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म माळले त्यांना उचलून वरती घ्यावे. साहेबांची ही क्षमता नियतीने ओळखली आणि माढा लोकसभेचे खासदारपद त्यांच्याकडे अक्षरशः चालत आले. कारण सुरुवातीपासूनच ही निवडणूक जनतेने आपल्या हाती घेतली होती. धैर्यशील भैयांना खासदार करायचेच या ध्यासाने अवघी जनता आतुर झाली आणि तिने भरभरून मतदान करून साहेबांना एका ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार बनवले.
आभाळालाही कोडे पडावे एवढ्‌या विशाल उंचीची काही माणसे असतात किती भाग्यवान असतो आपण जेव्हा ती आपली आसतात. भैयासाहेबांचे खासदार होणे ही घटना म्हणजे आपल्या परमआनंदाची, अभिमानाची गोष्ट. आम्ही वर्षानुवर्षे उराशी बाळगलेले एक स्वप्न सत्यात उतरले. आपल्या माणसाने दिल्लीचे तख्त काबीज केले. स्थिर वृत्तीचा उंच हिमालय भीषणतेतही निर्भय निश्चल नेता ऐसा मिळे आम्हाला काय असे मग उणे यशाने दुमदुमवू त्रिभुवने आदरणीय साहेबाना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जनतेची सेवा करण्याची, त्यांचे दुःख दूर करण्याचे, त्यांच्या आयष्यात समृद्धीचे नवे पर्व आणण्याचे सामर्थ्य जे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहेच… फक्त त्याला नवे धुमारे फुटावेत एवढीच सदिच्छा….! सहकारमहर्षीचा समृद्ध वारसा कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन नजरेत दूरदृष्टी… आवाजात नम्रता विचारात प्रगल्भता… निर्णयात अचूकता.. यातच लपलीय धैर्याशिलभैयांच्या नेतृत्वाची सफलता.

नितीन बनकर
शब्दांकन -डॉ.प्रेमनाथ रामदासी

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button