
रानभाजी – अंबाडी
इंग्रजी – हिबिस्कस सबडेरिफ्फा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संग्राहक:आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17ऑगस्ट 2024 :
अंबाडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात. अंबाडीचे उत्पादन भारतात विदर्भ, खानदेश व पंजाबचा काही भाग या ठिकाणी होतो. अंबाडीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते- अन्वष्टा, अम्बारी, माचिका, अंबाडी, गोंगुरा. अंबाडीचे सर्वात जास्त उत्पादन चीन मध्ये होते. ही सुमारे १.५ ते २ मीटर उंच वाढणारी वनस्पती आहे. हे झाड सरळ वाढते. ह्याची पाने चवीने आंबट असतात. कोवळी असतांना याच्या पाल्याची भाजी करतात. याच्या बियांपासून तेल काढतात. त्यास ‘हॅश ऑईल’ म्हणतात. यात टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल (टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त असते. त्यात ओमेगा-३ व ओमेगा-६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात.
उपयोग
सर्वसाधारण भाजी, दोऱ्या, सतरंज्या, कागद करण्यास उपयुक्त. आयुर्वेदानुसार पित्त, जळवात, अजीर्ण इत्यादी साठी सुद्धा उपयुक्त.
पाककृती
# साहित्य – १० अंबाडीच्या जुडीतल्या काड्या चिरल्यावर साधारण २ वाट्या, अर्धा वाटी तांदुळ, ५-६ लसूण पाकळ्या, ३-४ लाल मिरच्या.
# कृती – अंबाडीची पाने खुडुन घ्यावीत. व्यवस्थित धुवुन बारिक चिरावीत. १ वाटी तांदुळ घेउन ते धुवावेत त्यात २.५ वाट्या पाणी टाकुन वर चिरलेली आंबाडी टाकावी. भांडं कुकरला लावावं. भाताबरोबरच अंबाडी मस्त शिजते. कुकर झाल्यावर भात व अंबाडी नीट घोटुन घ्यावी. लसूण ठेचुन घ्यावा. कढईत मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करुन लसूण टाकवा. लसूण थोडा लाल झाला की मिरच्या टाकाव्यात, थोडं तिखट टाकावं. घोटलेलं भात, अंबाडीचं मिश्रण टाकावं. चवी नुसार मीठ टाकुन चांगलं परतुन एक वाफ द्यावी. भाजी भाकरी किंवा पोळी बरोबर खावी. नॉर्मली भाता बरोबर अंबाडी शिजवत नाहीत. निराळी शिजवुन पण भात मिक्स करु शकता. फोडणी कमी वाटली तर अजुन लसणी घालुन वर फोडणी ओतावी. दुसर्या दिवशी पुन्हा खाणार असाल तर फोडणी अतिआवश्यक. भाजी पानात वाढुन मधे खळगा करुन त्यात कच्च तेल ओतावं.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण