ताज्या घडामोडी

ज्येष्ठ समाजसेविका जगुबाई मारुती जानकर अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित

ज्येष्ठ समाजसेविका जगुबाई मारुती जानकर अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11 ऑगस्ट 2024 :
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तरंगफळ ग्रामपंचायत सदस्य जगू बाई मारुती जानकर यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन यांच्यावतीने बारामती येथे आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या समारंभामध्ये अहिल्यारत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र दादा पवार, वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन राष्ट्रीय सल्लागार समिती राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन यु बी सी चे प्रदेश संपर्कप्रमुख व प्रदेश प्रसिद्धीप्रमुख), ज्येष्ठ नेते सतीशराव खोमणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून दीपप्रज्वलनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती महोत्सवा चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे, राष्ट्रीय समन्वयक सखाराम नाना खोत, सचिव अजय गाढवे, प्रदेश अध्यक्ष महादेव सातपुते, इत्यादींसह समाजातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.


वयाच्या 76 व्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशा जोमाने सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत असलेल्या जगू बाई मारुती जानकर यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपातळीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे त्याचबरोबर अनेक विविध सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा रत्नप्रभादेवी बहुउद्देशीय अपंग संस्थेच्या माध्यमातून तीस वर्षापासून त्यांचा मुलगा गोरख मारुती जानकर यांनी हे चालवीत आहेत. सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील कार्याने या माय लेकरांनी समाजामध्ये नावलौकिक प्राप्त केलेला आहे. श्रीमती जानकर यांना मिळालेल्या अहिल्यारत्न पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button