पहिल्याच अधिवेशनात खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांची रेल्वे सुसाट…

पहिल्याच अधिवेशनात खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांची रेल्वे सुसाट…
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31/07/2024 :
देशाच्या संसदेत माढा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांबरोबरच राजमाता आहिल्यादेवी होळकर जन्मभूमी चौंडी ते कर्मभूमी इंदौर रेल्वेमार्गची देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांनी मागणी केली.खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी संसदेतील सभागृहात मांडलेले प्रश्न व केलेल्या मागण्या पाहता पहिल्याच अधिवेशनात खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांची रेल्वे सुसाट धावत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पुढील प्रमाणे मागण्या मांडल्या.
⭕ पंढरपुर-फलटण रेल्वे मार्गाची मागणी
▶️सद्यस्थितीत लोणंद ते फलटण एवढाच मार्ग पूर्ण झाला. पण त्यानंतरचा फलटण ते पंढरपूर हा जवळपास १०५ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. या प्रकल्पात राज्य सरकार देखील ५०% वाटा देणार आहे.केंद्र सरकारने लवकरच उरर्वरित निधीची तरतुद करुन रखडलेल्या रेल्वे मार्गाला लवकरात लवकर गती द्यावी.
▶️तसेच सध्या लोणंद-फलटण या २६ कि.मी. मार्गावर रेल्वे सुरू झाली आहे.पण सिग्नलिंग, मनुष्यबळ नसल्यामुळे रेल्वेला ८० मिनिटे लागतात. या मार्गावर रेल्वेगाडीचा वेग वाढवण्यासाठी सिग्नलिंग व्हावे. मनुष्यबळ मिळावे. तसेच फलटण-पुणे-मुंबई रेल्वे गाडी सुरू व्हावी.
▶️लोणंद-फलटण-बारामती या मार्गाचे लोणंद- फलटण काम झाले आहे. परंतु फलटण-बारामतीसाठी भूसंपादन झाले आहे. टेंडर प्रक्रिया ही झालेली आहे. हे काम ही लवकर पुर्ण करण्याबाबत प्रशासनाला सुचना करणे गरजेचे आहे. त्यामुळे फलटण मार्गे आणखी काही रेल्वे गाड्या सुरू करण्याची देखील मागणी केली.
⭕कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉपसाठी प्रवासी वाहतुक डब्यांच्या (LHB कोचेसच्या) POH निर्मितीचे काम मिळावे
▶️कुर्डुवाडी येथे रेल्वे वर्कशॉप ची स्थापना १९३० साली झाली. आज हे वर्कशॉप आपल्या शंभरी कडे वाटचाल करत आहे. पूर्वी या ठिकाणी नॅरोगेज (NG) स्टीम लोकोमोटिव्हज व नॅरोगेज (NG) कोचेसचे काम चालायचे पूर्वी या ठिकाणी १००० हजार च्या आसपास कामगार काम करायचे या वर्कशॉप मुळे कुर्डुवाडी व आजूबाजूच्या गावांची अर्थव्यवस्था चालायची कालांतराने स्टीम इंजिन काल बाह्य झाले सगळीकडे ब्रॉड गेजचे जाळे वाढले त्यामुळे नॅरोगेज चे अस्तित्व संपत आले.
▶️२०१० साली आ. रणजितसिहं मोहिते पाटील राज्यसभेचे खासदार असताना त्यांच्या प्रयत्नातुन इथल्या वर्कशॉप साठी ३० कोटी रुपयाची तरतूद झाली आणि या ठिकाणी ब्राडगेज वैगन च्या POH च काम सुरु झाले. त्यानंतर २०१७ साली मा. विजयसिंह दादा मोहिते पाटील माढा लोकसभेचे खासदार असताना त्यांच्या प्रयत्नातुन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु साहेबांनी या ठिकाणी ६० कोटी रुपयांची तरतुद केली व या वर्कशापसाठी नवीन शेड ची निर्मिती झाली.
▶️एकेकाळी १००० कामगार असणाऱ्या वर्कशॉप मध्ये आज जवळपास ३०० कामगार राहिले आहेत हे वर्कशॉप जर टिकवायचे असेल तर कुर्जुवाडी वर्कशॉप ला कायमचे काम मिळाले पाहिजे त्यासाठी येथे प्रवासी वाहतुक डब्यांच्या (LHB कोचेसच्या) POH चे काम मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार भरती होईल व कुर्डुवाडी शहर व आजू बाजूच्या भागात अनेक छोटे मोठ्या उद्योग वाढीस चालना मिळेल हे या भागाच्या विकासाला पोषक ठरेल.
⭕राजमाता आहिल्यादेवी जन्मभूमी ते कर्मभूमी नव्या रेल्वेमार्गाची मागणी
▶️जेऊर-चौंडी-आष्टी या मार्गाला सन २०१७ च्या अर्थसंकल्पात १ हजार ५६० कोटी रु तरतुद करण्यात आली होती. त्या कामाला गती देवुन हा रेल्वेमार्ग परळी-अहमदनगर रेल्वे मार्गास जोडुन चौंडी ते इंदौर रेल्वे द्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभुमी ते कर्मभुमी जोडण्याबाबत सरकारला विनंती केली..
यामुळे पंढरपूर-चौंडी-शिर्डी-इंदौर असा नवा मार्ग तयार होऊ शकतो. यामुळे मध्य प्रदेश मधल्या अनेक भाविक पंढरपूर, चौंडी येथे दर्शनला येतील व महाराष्ट्रातील भाविकांना इंदोरला जाणे सोईचे होईल यासाठी निधीची तरतूद झाली पाहिजे म्हणून मागणी केली.