ताज्या घडामोडी

अधुनिक दारिद्रय

अधुनिक दारिद्रय

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 28/01/2024 :
गेल्या काही वर्षात फॅशन इंडस्ट्रीत एक नवा प्रकार दिसू लागला आहे, तो म्हणजे फाटके कपडे घालून फिरायचे. मुले – मुली गुढघ्यावर फडलेली जीन पॅन्ट घालतात ते पण एक वेळ परवडले, पण कुल्ल्यावर पॅन्ट फाडून, आणि अजून पुढे जाऊन काही अराजक वृत्तीच्या मुलींचा शर्ट, टी-शर्ट नेमका अश्या ठिकाणी फाडलेला असतो, कि वाटते शक्ती कपूर, अजित, निळू फुले या जुन्या जमान्यातील व्हिलननी यांच्यावर हात टाकला की काय? त्या काळी सिनेमातील नायिकेचे अथवा हिरोच्या बहिणीचे ब्लाउज दंडावर फाडत असत, तितकेच त्या काळातील समाजाला मर्म समजायला पुरेसे असे. आधुनिक जगातील असेल कपडे, आपल्या चांगल्या कापड्यांपेक्षा अनेक पटीने महाग असतात हे पहिले कि फॅशन दुनियेची किव येते.
हीच व्यथा साज शृंगाराची असते. सुरेख व सुंदर आभूषणे घालण्यासाठी परंपरा जपत जुन्या काळापासून मुली, महिला कानाची पाळी व नाकपुडीत छिद्र करून घेत असत, ज्यामुळे डूल, नथ वगैरे आभूषणे घातल्यावर मुलींच्या सौंदर्यात भर पडे.
आज काल मुले-मुली अशी छिद्रे कुठे कुठे करून घेतील याचा अंदाज बांधणे सुद्धा कठीण झाले आहे. बेंबीवर, भुवयांवर, ओठावर, जिभेवर छिद्रे पाडून त्यात रिंग आणि दुसरी आभूषणे अडकवतात, हे पाहिले कि मात्र किळस व तिरस्कार येऊ लागतो. या पुढे जाऊन गुप्तांगावर छिद्र करून त्यात आभूषणे मिरवत असतील तर कदाचित नवल वाटायला नको. कसं आहे, सामाजिक भान त्यांना नसले तरी मला लिहिताना ठेवणे खूप अवश्यक आहे. माझे विचार वाचल्यावर, कदाचित काही आधुनिक विचारी लोकांच्या भावना दुखावण्याचा गुन्हा माझ्याकडून नक्कीच झाला आहे हे मी मान्य करतोच, असे असले तरी मला त्याचा कसलाही पच्छाताप होणार नाही.
या शिवाय शरीरावर विचित्र चित्रे विविध ठिकाणी गोंदवून घेणे, यात सौंदर्य कमी ओंगळ दर्शन जास्त दिसते. या शिवाय केसांना विविध रंगांच्या छटा देणे, या मुळे असे करणाऱ्या महिला सुंदर न दिसता डाकिणी भासतात. तसेच हाता पायाची नखे अवास्तव वाढवून त्याचे विद्रुप दर्शन करवणे, हे पाहिल्यावर चेटकीण, हडळ बरी असे म्हणायची इच्छा होते.
काही मुले केस वाढवून वेणी आणि पोनी घालतात. दाढी मिश्या वाढवून सोबत वाढलेल्या केसांच्या वेण्या पाहिल्यावर अश्या माणसांची नक्की किळस येते. परमेश्वराने तुम्हाला पुरुषाचा जन्म दिला असताना तुम्ही मात्र तृतीयपंथी असल्यासारखे वागता, याला काय म्हणावे?
आधुनिक फॅशनचे असे ओंगळ दर्शन पाहिल्यावर, असली फॅशन हि सौंदर्य वाढवण्यासाठी असते की विकृती दर्शवण्यासाठी आहे हेच समजेनासे झाले आहे.
आधुनिक फॅशनच्या पुढच्या पर्वात फाटके बूट, चप्पल, मोजे वापरायची प्रथा सुरू झाल्यास नवल वाटायला नको. असे लोक स्वतःच्या गाड्या मात्र टाप टीप असण्याचा अट्टाहास करतात. गाडीचे फाटके बंपर, फुटलेला लाईट, चपकलेले दरवाजे यांची पण फॅशन करायला हरकत का नसावी?, किमान विमा कंपन्यांचे पैसे तरी वाचतील. याशिवाय त्यांना विनंती आहे, आपली घरे हि मोडकी, तुटकी, गचाळ ठेवा, फॅशनच्या नावाखाली तेही करावे, हरकत नसावी.

विजय लिमये 9326040204

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button