ताज्या घडामोडी

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी ६२ कोटी ९७ लाखांचा निधी

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी ६२ कोटी ९७ लाखांचा निधी

Akluj Vaibhav News Network.

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 20/07/2024 :

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी 62 कोटी 97 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
यात वेळापूर ते म्हेत्रेमळा रू.५ कोटी ५४ लाख , एन.एच.२६५ ते कोंडबावी रस्ता रू. ७ कोटी १४ लाख, चाकोर ते कुरणबंगला रस्ता रू.६ कोटी ६ लाख,यशवंतनगर ते गिरझणी रस्ता रू.७ कोटी २६,एन.एच.२६५ जी ते वाफेगाव रस्ता रू.१० कोटी,एन.एच.१६५ जी २५/४ ते वाघोली रस्ता रू.१० कोटी ६७, बडेखान (सदशिवनगर) ते उंबरे रस्ता रू.११ कोटी ७१ इजिमा १७९ ते खरातवस्ती-शिवामृत डेअरी रस्ता रु.४ कोटी ५५ लाख.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ६२ कोटी ९७ लाख रूपये मंजूर करून आणले त्याबद्दल तालुक्यातील नागरिकांनी आ.मोहिते-पाटील यांचे आभार मानले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.