ताज्या घडामोडी

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी भिमराव बाबर तर व्हा चेअरमन पदी सौ सुनिता जाधव यांची निवड

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी भिमराव बाबर तर व्हा. चेअरमन पदी सौ.सुनिता जाधव यांची निवड

Akluj Vaibhav News Network.

अकलूज दिनांक 19/07/2024 :

श्रीपूर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना सेवकांची सह. पतसंस्था मर्यादित श्रीपूर या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली त्यात पतसंस्थेच्या चेअरमनपदी भिमराव शंकर बाबर यांची व व्हा चेअरमनपदी सौ सुनिता सर्जेराव जाधव यांची सर्वानुमते निवड झाली. यावेळी शिंदे सिध्दनाथ रंगनाथ, जाधव हरि किसन, आवताडे बाळासाहेब औदुंबर, कानगुडे ब्रम्हदेव महादेव, पाटील अण्णासाहेब उध्दव, नागणे सिध्देश्वर संभाजी,
पवार अरुण नारायण, वाघमारे सिताराम विठ्ठल, भुसनर हणमंत हरि, खाडे भिकाजी ज्ञानेश्वर यांची सर्वानुमते संचालक मंडळ कार्यकारिणीत निवड झाली. सचिव म्हणून भारत जाधव यांची निवड करण्यात आली. चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे तसेच कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ यशवंतराव कुलकर्णी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
नुतन चेअरमन भिमराव बाबर हे मनमिळाऊ व सर्वांचे आवडते व्यक्तीमत्व व अधिकारी यांचे विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जातात. या नुतन चेअरमन व्हा चेअरमन व संचालक मंडळ यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे. एन यु बी सी अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख व महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुख, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, पाक्षिक वृत्त एकसत्ताचे कार्यकारी संपादक विलासनंद विठ्ठल गायकवाड, पत्रकार आदिनाथ मोहन जाधव यांनी नूतन चेअरमन भीमराव बाबर यांचे अभिनंदन केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.