खा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार कॅरी ऑन

खा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार कॅरी ऑन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 09/07/2024 :
अनेक महाविद्यालयामध्ये विद्यार्थी नापास झालेले असून त्यांना एनईपीमुळे पुढच्या वर्षी कुठेही प्रवेश घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे. अशा नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यांना गतवर्षी प्रमाणे पुढील वर्गात एका सत्रासाठी प्रवेश देणे अत्यंत आवश्यक आहे याबाबत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून मागणी केली होती.
यासंदर्भात दि.९ जुलै रोजी संपन्न झालेल्या अकॅडेमीक कौन्सिल सभेत कॅरी ऑन संदर्भात सबंधित विषयाची समिती गठीत करून (गेल्यावर्षी ची समिती आहे त्यांनी तात्काळ आवश्यक ते year चे इ. बदल करून )draft करणे व त्या draft ला पुढे Board of Deans च्या बैठकीत मंजूरी घेतली जाईल. लगेच अकॅडेमीक कौन्सिल(ऑनलाईन सभा घेऊन )ची मान्यता घेऊ व carry on देऊ असे आश्वासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी दिले आहे.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कॅरी ऑन विषयी कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टळणार आहे याबाबत विद्यार्थी शिक्षण संघटनांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे आभार मानले.