सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान लवकर मिळावे – आ.रणजितसिंह मोहिते-पाटील

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान लवकर मिळावे – आ.रणजितसिंह मोहिते-पाटील
- Akluj Vaibhav न्यूज नेटवर्क.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 09/07/2024 :
राज्यातील ४० तालुक्यात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला होता त्या सोलापुर जिल्ह्यातील करमाळा,माढा,बार्शी माळशिरस सांगोला या पाच तालुक्यांचा समावेश होता.त्यानंतर कमी पर्जन्यमान झालेल्या राज्यातील उर्वरित १०२१ मंडला मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील उर्वरित ५५ महसूली मंडलांचा समावेश आहे.पाच तालुक्यात दुष्काळी मदत म्हणुन अनुदान जाहीर झाले.उर्वरित ५५ महसुली मंडळामध्ये दुष्काळी सवलती लागू झाल्या पण अजुनही सोलापुर जिल्ह्यातील दुष्काळामुळे बाधितांच्या समस्या सुटलेल्या नाहीत या समस्या लवकरात लवकर सोडवून शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
शासनाच्या विविध योजना व अनुदान घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेला प्रत्येक वेळी आधार लिंक करणे किंवा ईकेवायसी करावे लागते,वेबसाईट बंद पडणे,सर्व्हर डाऊन असणे,बहुतांश वेळा ईकेवायसी करण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात,यासाठी वेळ, पैसे,श्रम वाया जात आहे.तांत्रिक अडचणी कायमस्वरुपी सोडवुन केवायसी प्रणाली सुलभ करावी तसेच दुष्काळी परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील ५ लाख १९ हजार ८८९ शेतकरी बाधित झाले आहेत त्यापैकी त्या त्या तालुक्यातील संबंधित विभागांनी,३ लाख ३३,हजार ८०८ शेतकर्यांचा डाटा जिल्हा प्रशासनाला पाठवला आहे. त्यापैकी फक्त २ लाख ७७ हजार ४२४ शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान ४११ कोटी रु मिळाले आहेत.उर्वरित लाखो बाधित पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळण्यासाठी शासन तातडीची कारवाई करावी व दुष्काळी अनुदान मिळण्यासाठी कागदपत्रे व ई केवायसी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १० जुलै ची अंतिम मुदत दिली आहे.ती मुदत वाढवून मिळावी म्हणून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मागणी केली
यावर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जो पर्यंत शेवटच्या शेतकर्याला अनुदान मिळत नाही तोवर शासन मुदत वाढवनार असुन सोलापुर जिल्ह्यातील अनुदानापासुन वंचित असलेल्या शेतकर्यांची ईकेवायसी ची प्रक्रीया १५ दिवसात पुर्ण करुन त्यांना अनुदान वितरीत करण्यात येईल असे सांगितले.
पुढे आमदार मोहिते-पाटील म्हणाले जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांसह दहावी-बारावी व उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सवलती जाहीर झाल्या.त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अद्याप परीक्षा शुल्क परत मिळालेले नाही.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०८ महाविद्यालये असून, विद्यापीठांतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी अंदाजे ६५ हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यातील सोलापुर दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना ही सवलत अपेक्षित असताना जिल्ह्यातील दुष्काळ जाहिर झालेले पाच तालुके व व उर्वरित ५५ मंडलातील एकाही विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क परत मिळालेले नाही ते लवकरात मिळावे अशी मागणी केली
त्यावर मंत्री अनिल पाटील यांनी संबधित विद्यार्थ्यांना सवलती मिळण्यात असणार्या अडचणींचा निपटारा करुन लवकरात लवकर सवलतींचा लाभ देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दुष्काळी मदतीपोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले दुष्काळी अनुदान संबंधित बँकांनी कोणत्याही कर्ज खात्यामध्ये किंवा अन्य वसुलीपोटी जमा करून घेऊ नये, असे शासकीय आदेश असताना सोलापुर जिल्ह्यातील काही तालुक्यात राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान थेट कर्जात जमा केल्याने बँकांनी नियमांची पायमल्ली करत थेट कर्जखात्याकडे पैसे वळवले आहेत.यासंदर्भात शेतकऱ्यांनी यासंबंधी बँकेच्या वरिष्ठ शाखेसह, जिल्हा उपनिबंधक,तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत पण अजुनही तोडगा निघालेला नाही यावर शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी केली
त्यावर मंत्री महोदयांनी शासनाकडे यासंदर्भात तक्रारी आल्यास शासन यावर नक्की तोडगा काढेल असे अश्वासित केले.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी लेखी उत्तर देताना सांगितले की शासन निर्णय दिनांक १६/०२/२०२४ अन्वये राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मी पेक्षा कमी झाले आहे, अशा महसूली मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या महसूली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेली नाहीत, अशी सोलापूर जिल्ह्यातील ५५ मंडळे देखील दुष्काळ सदृश्य मंडळे म्हणून घोषित केलेली असून या मंडलांनाही दुष्काळाच्या संदर्भातल्या आठ सवलती लागू करण्यात आल्या आहेत..
🟢आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यामुळे मिळाली ई केवायसीला मुदतवाढ
ई केवायसी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १० जुलै ची अंतिम मुदत दिली आहे.ती मुदत वाढवून मिळावी म्हणून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मागणी केली असता मंत्री अनिल पाटील यांनी जो पर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही तो पर्यंत इतर केवायसीची मुदत वाढवणार असल्याचे स्पष्ट केले.