ताज्या घडामोडी

श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्थेच्या वतीने अंगारक चतुर्थी उत्साहात साजरी

श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्थेच्या वतीने अंगारक चतुर्थी उत्साहात साजरी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 26/06/2024 :

श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्था आनंदनगर अकलूज( तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य) या ठिकाणी अंगारक चतुर्थी
विविध कार्यक्रमांचे आयोजन करून
उत्साहात भक्तीभावाने साजरी करण्यात आली. संस्थेच्या विश्वस्त व शिवशंकर बझारच्या चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते सकाळी सात वाजता महा अभिषेक करून विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत आनंदी गणेश भजनी मंडळ पाटीलवस्ती यांच्या भजनी गीताचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला होता. दुपारी चार ते पाच या वेळेत अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम पार पडला यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान स्वरतरंग अकलूज यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री दहा वाजता कलामूर्ती डान्स अकॅडमी अकलूज यांच्या नृत्य आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

रात्री १० वाजून २८ मिनिटांनी चंद्रोदय झाल्यानंतर सौ. देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. श्रीक्षेत्र आनंदी गणेश हे ठिकाण नेहमीच भावीक भक्तांच्या मनामध्ये उर्जितावस्था निर्माण करणारे तीर्थक्षेत्र राहिले आहे. वर्षभर या ठिकाणी भाविक भक्त येतात . अंगारक चतुर्थी निमित्त झालेल्या कार्यक्रमात असंख्य भक्तगणांनी हजेरी लावली. वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. सदर कार्यक्रमास ट्रस्टी कुलदीप पाटील, रणजीत चव्हाण, भारतराजे भोसले, प्रकाश नरसाळे, अशोक दांगट, राहुल वाघमारे आदीसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अंगारक चतुर्थी निमित्त संस्थेच्या वतीने दिवसभर प्रसादाचे वाटपही भाविकभक्तांना करण्यात आले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.