ताज्या घडामोडी

शिक्षण प्रसारक मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

शिक्षण प्रसारक मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 27/06/2024 :

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य.)या संस्थेतील विविध शाखेतील इयत्ता १० वी च्या १०५ व इयत्ता १२ वी मधील ६७ अशा एकूण १७२ गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार सोमवार दिनांक १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता स्मृतीभवन शंकरनगर येथे आयोजित केला आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा सत्कार समारंभ होत आहे.
या सत्कार समारंभात १० वीतील ९० टक्के व त्या पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या ८५ विद्यार्थ्यांचा, शाखावर प्रथम आलेल्या १७, विषयात प्रथम आलेले ३, अशा एकूण १०५ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. व इयत्ता १२ वीच्या ८० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले ६१ विद्यार्थ्यांचा, विषयात प्रथम आलेल्या ३, व्यवसाय विभागातील १, शाखावर प्रथम आलेले २ असे एकूण ६७ गुणवंतांचा यामध्ये समावेश आहे.
इयत्ता १० वी साठी संस्थेच्या ३३ शाखेतून २९०१ विद्यार्थ्यांपैकी २८१३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९७.६० टक्के लागला. या मध्ये ९ शाखांचा निकाल १०० टक्के लागला. इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील संस्थेच्या ७ शाखेतून १७१६ पैकी १६१० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९३.८२ टक्के लागला.या मध्ये दोन शाखांचे निकाल शंभर टक्के लागले. पीक विज्ञान पेपर २ या मध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त करणारे तीन विद्यार्थी आहेत.
इयत्ता १० वी मध्ये जिजामाता कन्या प्रशाला अकलूज ची कु. युगंधरा प्रेमनाथ रामदासी हिने ९७.४० टक्के गुण मिळवीत संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला. तर सदाशिवराव माने विद्यालयाचा चि. ऋषिकेश सुधीर कुंभार यांनी ९७ टक्के मिळवीत द्वितीय व याच विद्यालयाचा चि. श्रेयस स्वानंद पवार यांनी ९६.२० टक्के मिळवित तृतीय क्रमांक प्राप्त केला.
इयत्ता १२वी मध्ये कु. सानिया नजीर बागवान हिने ९४.५० टक्के गुण मिळवित संस्थेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर कु. मुग्धा मुकेश निंबाळकर हिने ९२.३३ टक्के गुण मिळवित द्वितीय क्रमांक व कु. अदिती बळीराम शिकारे हिने ९०.१७ टक्के मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला. हे तीनही विद्यार्थी सदाशिवराव माने विद्यालय अकलूज विज्ञान शाखेचे आहेत.
या सर्वांचा सत्कार या कार्यक्रमात होणार आहे. यावेळी संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, मुख्याध्यापक संजय गळीतकर, अमोल फुले, मुख्याध्यापिका सौ सुनीता वाघ आदी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.