माजी उपमुख्यमंत्री विजयदादांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
माजी उपमुख्यमंत्री विजयदादांच्या
80 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 12/06/2024 :
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री,व माजी संसद सदस्य (लोकसभा) विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.12 जून 2024 रोजी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना व विजयरत्न सहकारी पशु-पक्षी संवर्धन संघ या संस्थांमार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन कामगार कल्याण केंद्र, शंकरनगर येथे करणेत आले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील,यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, कारखान्याचे संचालक सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रामचंद्र सिद, गोविंद पवार, सुभाष कटके, तज्ञ संचालक-प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील व जिल्हा परिषद सदस्य अरूण तोडकर, माजी संचालक सुभाष पताळे तसेच शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक – पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, सौ.हर्षाली निंबाळकर तसेच इंडियन मेडिकल असोशिएशन, अकलूज चे डॉ. संतोष खडतरे, ब्लड बँकेचे डॉ.अजित गांधी व त्यांचेकडील स्टाफ त्याचबरोबर कारखान्याचे अधिकारी, युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते. या रक्तदान शिबीरामध्ये कारखाना व विविध संस्थांचे कर्मचारी, शंकरनगर परिसरातील युवक, महिला, नागरीक यांनी रक्त सहभाग घेऊन रक्तदान केल्याने मानवी जीव वाचविण्यास मदत होते, अशा सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी सहभागी रक्तदात्यांचे अभिनंदन केले. शिबीरासाठी पार सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, विजयरत्न सहकारी पशु-पक्षी संवर्धन संघ या संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी व कामगार युनियन यांनी सहकार्य केलेची माहिती कारखान्याचे सेक्रेटरी अभयसिंह माने-देशमुख यांनी दिली.