ताज्या घडामोडी

अजितदादा पवारां,सोबत गेलेल्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांची दणाणले धाबे – विठ्ठल पवार राजे

अजितदादा पवारां,सोबत गेलेल्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांची दणाणले धाबेविठ्ठल पवार राजे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 06/06/2024 :
बारामती लोकसभा मतदारसंघातून १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार यांना ०१ लाख ५८ हजार ३३३ मताधिक्याने एकतर्फी चितपट केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्धीस दिलेल्या निकाल पत्रकावरून स्पष्ट होत आहे. पुणे जिल्ह्यासह शरद पवार यांच्या उमेदवारांना सर्वत्र मताधिक्य मिळालेले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मताधिक्य सुप्रिया सुळे यांना बारामतीतून मिळाल्याची माहिती पुढे आलेली आहे, त्यामुळे शरद पवार यांच्या पाठीशी बारामतीकर खंबीरपणे उभे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आणि बारामतीकरांनी अजितदादा पवार यांचे बंड सफसेल पणे नाकारल्याचे सिद्ध होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तब्बल १ लाख ५३ हजार ९६० मताधिक्य बारामतीकरांनी दिले असून त्यामधून ४८ हजार १६८ मतांचे मताधिक्य खासदार सुप्रियाताई सुळे यांना मिळाले आहे.


संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना इंदापूर , पुरंदर, दौंड, भोर मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याची आकडेवारी पुढील प्रमाणे.. सुप्रियाताई सुळे इंदापूर मधून २५ हजार ६९८ तर दौंड तालुक्यामधून २५ हजार ५३१ मतांची आघाडी मिळालेली आहे. यावरून इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांची कामगिरी अपयशी ठरल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुरंदर मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे यांना ३४ हजार ३८७ मताची आघाडी मिळालेली आहे. तर खडकवासला मतदारसंघ वगळता, भोर मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे यांना ४१ हजार ६२५ मतांची आघाडी मिळालेली आहे खडकवासला मतदार संघातून विरोधी पक्ष भाजपला ला २१ हजारांचे लीड मिळाले होते त्याचे कारण तो मतदार संघ शहरी आणि तिथे भाजपाचे आमदार भीमराव तापकीर असल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे भाजपा मंत्री पुढारी गब्बरगंड ठेकेदार नेते अजितदादा पवारां,सोबत तर मतदार शरद पवार साहेबांसोबत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामधील केवळ खडकवासला मतदारसंघ वगळता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे दोन लाखाचे वर मताधिक्य संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना मिळाल्याने या पाचही विधानसभा मतदारसंघातील अजितदादा पवारां,सोबत गेलेल्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांची धाबे दणाणले आहेत.
देशभरातून शरद पवार व संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपा सह मित्र पक्षाला कांदा दुध कापूस ऊस उत्पादक शेतकरी मतदारांनी नाकारत दिलेली धोबीपछाड मुळे भाजपाचा संपूर्ण गड ढासळलेला आहे, महाराष्ट्रातील शेतकरी आणि मतदारांनी तसेच मराठा समाज बांधवांनी महाराष्ट्राचे किंग मेकर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष , उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची सरशी झाल्याने महाराष्ट्राचे वातावरण बदललेले आहे.

त्यामुळे येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणात बदलेल आणि त्यामध्ये भाजपाला सपशेल शेतकरी कष्टकरी कामगार खास करून कांदा कापूस ऊस दुध उत्पादक हे धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाहीत हे या लोकसभेच्या निवडणुक निकालावरून सिद्ध झालेलं आहे. “भाजपाने महाराष्ट्र राज्य सह देशभरातील शेतकरी विरोधी भूमिकेमुळे, युवा मतदारही विरोधात गेल्याने भाजपाला जो दो सौ पार चा फटका बसलेला आहे तोच फटका २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाला बसला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्यत येणाऱ्या २०२४ विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला मोठी कसरत येत्या चार महिन्यांमध्ये करावी लागेल. त्यामध्ये खास करून कांदा दूध कापूस सोयाबीन ऊस हरभरा उत्पादक शेतकरी व कर्जमुक्ती त्यासोबत कृषी पंप वीजबिल मुक्ती या विषयावरती मोठी कसरत करत प्रत्यक्षात सत्यात उतरावी लागेल तरच काही शक्य असेल अन्यथा सत्ताधाऱ्याला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पूर्णपणे आजच्या मतदानाच्या आकडेवारीवरून रसातळाला नेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.