⭕अकलूज आर टी ओ कार्यालय भ्रष्टाचाराचे आगार,,, कोट्यवधी ची माया जमवणाऱ्या भ्रष्ट अधिकारी वर्गाला पायबंद घालनार कोण?

⭕अकलूज आर टी ओ कार्यालय भ्रष्टाचाराचे आगार,,, कोट्यवधी चीमाया जमवणाऱ्या भ्रष्ट अधिकारी वर्गाला पायबंद घालनार कोण?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 8/11/2023 :
ग्रामीण भागातील जनतेची वाहन विषयक , पासिंग , ड्रायव्हिंग लायसन्स सुलभतेने मिळावीत , सोलापूर सारख्या ठिकाणी जाण्याची दगदग , वेळ , आणि पैसा वाचावा म्हणून , महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह जी मोहिते पाटील साहेब यांनी स्वतंत्र असे आर टी ओ कार्यालय एम एच 45 हे चार तालुक्यासाठी आणले , आणि शंकरनगर येथील मोकळ्या जागी दृष्ट लागेल अशी भव्य इमारत उभी राहिली.
या विभागातील जनता , शेतकरी , युवा वर्ग खुश झाला. परंतु ही त्यांची खुशी कांहीं काळच अस्तित्वात राहिली.
हे कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे आगर बनलेले असून दररोज लाखो रुपयांची संघटित लूट एजंट, विविध परवाने याचे माध्यमातून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आमचे निदर्शनास आल्याने प्रत्यक्षात नेमके काय घडते हे जाणून घेण्यासाठी सदर कार्यालयास भेट दिली असता , तेथे अनेक माहिती अधिकार टाकणारे , कांहीं पत्रकार , आणि विविध सामाजिक संघटनेचे लोक असे अनेक जण उपस्थित असलेले दिसले. ते पाहून हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी विचारणा केली असता तिथे येणाऱ्या वरील लोकांना दीपावलीच्या निमित्ताने भेट पाकिटे मिळतात असे समजले.
त्यामुळे या चार तालुक्या व्यतीरिक्त माहितीचा अधिकार फॉर्म भरून अनेक प्रश्नांची उत्तरे मागणाऱ्या लोकांची त्यांचे वकूब आणि मागणी प्रमाणे आर्थिक तरतूद केली जाते हे ही समजले.
या साठी ही मोठी आर्थिक तरतूद केली जाते. या शिवाय अकलूज मध्ये एखादा मोठा उपक्रम असल्यास आर टी ओ इन्स्पेक्टर कडून भरघोस अशी देणगी ही वसूल केली जाते.
या सर्व बाबी प्रामाणिक आणि आपल्या श्रमाच्या पगारातून कोणी करत नाही आणि करण्याचे कारण ही नाही.
या मागे निच्छितपने कांहीं तरी गौडबंगाल असणार हे जाणून च अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून इतकी धक्कादायक माहिती मिळाली की इथले ऑफिसर , एजंट , कर्मचारी यांची दररोज दिवाळी असते , आणि पगार फक्त नावाला असतो. वरकमाई च इतकी असते की एक आमदार त्याच्या दीर्घकालीन टर्म मध्ये भ्रष्टाचार करून ही मिळवणार नाही ते इथला ऑफिसर बिनभोबाट मिळवतो.
याचे मार्ग ठरलेले आहेत.
एखादे नवीन वाहन खरेदी केले असेल तर शासकीय नियमाने त्याचे पासींग करावे लागते. ते करण्याचा अधिकार हा याच कार्यालयाला आहे.
यासाठी शासकीय फी लहान वाहन 600 रुपये
मोठे वाहन 800 रुपये अशी कागदोपत्री फी आहे.
परंतु वाहन मालकाकडून त्या साठी 4500 रुपये अनधिकृत पने घेतले जातात.
यातील सोलापूर जिल्हा आर टी ओ ऑफिसर कडे आणि ज्यांच्या कडे अकलूज चां अतिरिक्त भार आहे त्या प्रमुखाला 1300 रुपये प्रति वाहन मिळतात
आणि अकलूज येथील आर टी ओ कार्यालयातील पी आय ला प्रति वाहन 1000 रुपये मिळतात ही त्यांची वर कमाई आहे.
भारतीय रस्त्यावर ठराविक वेगा पेक्षा अधिक वेगाने वाहन पळवले जाऊ नये म्हणून स्पीड गव्हर्नर बसवले जातात. ओरिजनल आय एस आय मार्किंग असलेल्या या उपकरणाची किंमत ही बाजारात 7000 रुपये आहे आणि हेच वाहनात बसवणे अपेक्षित असताना चायना बनावटीचे 4000 रुपये किमतीचे बसवून दिले जाते. व या द्वारे प्रति वाहन 3000 रुपये मिळकत केली जाते. परंतु याचा परिणाम म्हणून अपघातात वाढ होते.
वाहन चालवण्याचा परवाना देणे हे ही याच कार्यालयाचा कामकाजाचा भाग आहे.
जड वाहन चालवण्याचा परवाना लर्निग मिळण्यासाठी 352 रुपये तर पक्के मिळण्यासाठी 1058 रुपये अशी शासकीय फी आहे. परंतु याचे 8500 रुपये या चालका कडून वसूल केले जातात. यातील 3000 रुपये जिल्हा अधिकारी व उर्वरित रक्कम अकलूज येथील अधिकारी यांचेत वाटप केले जाते.
या शिवाय लहान मोटार सायकल ते चार चाकी (हलके वाहन) याचे ड्रायव्हिंग लायसेन्स मागे 600 रुपये अधिकाऱ्यांना मिळतात.
माळशिरस , माढा , करमाळा , सांगोला येथील मोठ्या वाहनांना ओव्हरलोडिंग कारवाई न करण्यासाठी अकलूज आर टी ओ द्वारे हप्त्याचे कार्ड वाटप केले जाते. अश्या कार्डाची फी ही 10,000 रुपये इतकी आहे.
जे असे कार्ड धारक नसतात त्यांचे विरोधात कारवाया करून आपले काम नियमबद्ध आहे असे दर्शवले जाते.
वाहनांना रिफ्लेक्ट करणारे रेडियम चे पत्रे ही निकृष्ट दर्जाचे असतात , आणि अश्या अनेक कारणाम्यातून वर्षाकाठी कोट्यवधी रुपये अधिकारी वर्ग मिळवत आहेत.
आपली ही वसुली निर्धोक पने व शांततेत चालावी म्हणून स्थानिक राजकीय नेत्यांना ही खुश ठेवले जाते. आणि पत्रकारांची लेखणी विकत घेतली जाते , परंतु या मुळे जनतेची मात्र अतोनात लूट होते. म्हणून या अधिकाऱ्यांनी नौकरी वर लागताना जे संपत्ती चे विवरण दिलेले आहे , व आज त्यांची संपत्ती किती आहे याची पडताळणी , अँटी करप्शन विभागाने स्वतः हून करणे आवश्यक आहे. असे झाले तर कोट्यवधीचे हे मासे अलगदपणे जाळ्यात अडकतील यात आम्हाला शंका नाही. आमचे ही स्तरावर मा. उप मुख्यमंत्री ना.अजित दादा यांचे कडे या संबंधाने कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.
ऍड अविनाश टी काले.
ज्येष्ठ पत्रकार
अकलूज , तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
मो. नं. 9960178213