ताज्या घडामोडी

चार जून नंतर संजय राऊतांच थोबाड फुटलेल असेल

चार जून नंतर संजय राऊतांच थोबाड फुटलेल असेल

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

शिल्लक शिवसेनेचे विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या बाष्कळ बडबडीचा आता येत्या चार जूनला अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ‘ द एंड ‘ होणार तर आहेच शिवाय त्यांच शाब्दिक द्रष्ट्या अक्षरशः तोंड फुटणार आहे , त्यामुळे ते या रक्तबंबाळ झालेल्या तोंडातून कोणत आणि कोणावर तोंडसुख घेणार अन् जे घेतलेलं तोंडसुख मराठी माध्यमातील लाचार आणि तितकेच निर्लज्ज चहावर बिस्कुट मोफत असणारे पत्रकार आम जनतेला काय म्हणून दाखवणार हा प्रश्न आहेच .
कारण हेच चहा बिस्कुट पत्रकार खासदार संजय राऊत यांनी रोज सकाळी टाकलेली बिगर मासांची हाडे दिवसभर चघळून चघळून जनतेच्या माथी मारत होती तरी यांचा टी.आर.पी.काही केल्या वाढत नव्हता हे वास्तव आहे , पण दिवसभर राऊतांनी दळायला दिलेल्या बेचव धान्या शिवाय यांच्याकडे स्वतःच डोक वापरून दळता येईल असे काहीच नाही कारण यातील बहुतांश महाचोर शासकीय भूखंडावरील श्रीखंड खाण्यात गर्क असतात मग त्यातून दुसर काय फलीत यांच्या हाती लागणार , मुळात यातील काहीजण तर उध्दव ठाकरे यांच्या मातोश्रीवरून काय किंवा शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांच्या सिल्व्हर ओकवरून आलेला आदेश शिरसावंद्य मानून आपला आलेला दिवस ढकलत होते आता निकाल जसा जसा जवळ येत आहे तशी तशी यांची तोंड दिवसागणिक हळूहळू बंद होत आहेत .
त्यात तो मागूतगिरी पत्रकार निखिल वागळे याच साध थोबाड बघितलं तरी अक्षरशः शिसारी येते कारण हा कधी खरं बोलतच नाही बहुधा याच्या जन्माच्या वेळचा पाळणा महाभकास आघाडीने चोरला असावा असंच काहीसं वाटत कारण जेंव्हा पासून केंद्रात व राज्यात भाजप आघाडीचे सरकार आले तेंव्हा पासून याच्या अगांची लाही लाही झाली आहे त्यामुळे तो सारखा वळवळल्यासारखा या बिळातून त्या बिळात शिरकाव करतो अर्थात याची मातोश्री व सिल्व्हर ओक ही दोनच बिळ आहेत , आता तर केंव्हाच महाभकास आघाडीची सत्ता पण गेली आणि हरामचा पैसा खाऊन मस्तावलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष पुर्णपणे मोडकळीस आले आहेत त्यामुळे निखिल वागळे याला मेंदूचा संसर्ग झाला आहे त्यामुळे तो आजकाल महाभकास आघाडीला अगदी चाळीस जागा मिळतील यावर आपली हिरवी मोहर उठवत आहे , भले त्याने किमान चाळीसच्या वर उरणाऱ्या आठ जागा महायुतीला देऊन आपल्या कद्रू मनाचा मोठेपणा दाखवला त्यामुळे हेही नसे थोडके असंच काहीसं म्हणावं लागेल .
सध्याचं राजकीय आकलन आणि त्याहूनही आकलनशक्ती खासदार संजय राऊत यांनी गमावली यात काय नवल नाही कारण ते शिल्लक शिवसेनेचे विश्व प्रवक्ते आहेत त्यामुळे त्यांनी तसं बरळलच पाहिजे नाहीतर तर त्यांच्या विश्व प्रवक्ते पदाला कुणी हिंग लावून सुध्दा विचारणार नाही कारण उध्दव ठाकरे यांच्यासह शरदचंद्र पवारसाहेब यांची मर्जी राखण्यासाठीच तर त्यांची नेमणूक आहे आणि त्यांचा त्यावर उदरनिर्वाह चालतो , पण इकडे पावसाचा पत्ता नसताना निखिल वागळे , आशुतोष , बरखा दत्त , करण थापर , आपला महाराष्ट्रात बसून मिशीला तुप लावणारा आणखी एक पत्रकार शिवाय आवटे का फिवटे नावाचा अतिशय हुशार नामधारी पत्रकार हे बेडकाचा आवाज काढून भाजपच्या नावाने डराव डराव का करतात हेच काही कळत नाही त्यात तो क्रियानिष्ट योगेंद्र यादव आहेच , तर अशांची चार जूनला एक मोळी बांधून ती बारामतीच्या तिरावर आमदार रोहित पवार यांच्याकडे सुपूर्द केली पाहिजे कारण या मोळीच्या जिवावर पवारांची कर्जत – जामखेडची जनता तरी याच पवारांना आपण मागील विधानसभा निवडणुकीत कशाला निवडून दिले होते यावर किमान विचार तरी करेल नाही का ॽ

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे. मुंबई

============================

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.