ताज्या घडामोडी

लोकसभा निवडणुकीनंतर कुणा कुणाची कशी वासलात लागणार

लोकसभा  निवडणुकीनंतर

 कुणा कुणाची कशी वासलात लागणार

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

दिनांक 29/05/2024 :
अठऱ्याव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला असला तरी या पक्षाच काय होणार , तो पक्ष डबऱ्यात गेल्यात जमा आहे अशा गप्पांचा फड अक्कलवान माणसांपेक्षा बेअक्कल माणसच जास्त चघळून चघळून रंगवताना दिसतात त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे चतुर आहेत त्यांनी कस काय इंडी आघाडीच्या संविधानच्या मुद्दाच्या डावाला गनिमी कावा करून उत्तर दिले याच साधर्म्य साधणारा युक्तिवाद केला , असल्या बातांचा पाऊस उन्हाळ्याची लाही लाही होत ऐकायला मिळतो त्यात काय नवीन नाही पण महाराष्ट्रातील लोकांनी शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह तितक्याच शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांना आता आपला राजकीय गाषा गुंडाळायला घ्या असा इशारा निकालाची पेटी खोलण्यापूर्वी देऊन चांगलीच धमाल उडवून दिली आहे .
राजकारण हे आळवावरच पाणी झालं आहे कारण ह्या आळवाची लागवड दस्तूरखुद्द शरदचंद्र पवारसाहेब यांनी एकोणीसशे ऐंशीचे दशक संपण्यापूर्वी केली होती अगदी तेंव्हापासून पवारसाहेब यांच्यावरील विश्वास पाणीपतच युद्ध अर्ध्यावर सोडून महाराष्ट्रातील राजकारणात अवतरला की काय अशी शंका येते त्यात काही गैर नाही , कारण शरदचंद्र पवारसाहेब हे राजकारणातील शकुनीमामा आहेत असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमी म्हणतात त्यात काही गैर नाही , कारण त्यांचं राजकारण म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी बांधायची आणि ती मोळी देशाच्या दावणीला स्वतःसाठी लावायची आणि त्याला राष्ट्रवादाचा मुलामा द्यायचा याचा अर्थ पवारसाहेब हे खरे देशाला न लाभलेले पंतप्रधान असा उल्लेख बजाज ऑटोचे दिवंगत उद्योगपती राहुल बजाज यांनी एका कार्यक्रमात पवारसाहेबांच्या उपस्थित केला होता , पण याचा अर्थ अजूनही साहेब नावाला कळला नाही कारण साहेब हा इंग्रजी शब्द आहे आणि साहेबांनी या शाळेत वयाच्या पन्नाशीत प्रवेश घेतला यामुळे त्यांच इंग्रजी किती तांत्रिक भाषेत घुटमळत असेल याचा अंदाज बांधा मग कळेल .
जो माणूस देशाचा पंतप्रधान होण्यासाठी एकीकडे धडपडतो अन् दुसरीकडे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कोणाला नेमामचे किंवा सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हाच झाला पाहिजे असा माणूस पुढच्या शंभर जन्मात तरी पंतप्रधान होण्याची सूतराम शक्यता आहे का ॽ तर असले हे साहेब ज्यांनी आयुष्यभर याला पाडा अन् त्याला गाडा यापलिकडे कधीच बेरजेचे राजकारण केले नाही कारण ते त्यांच्या रक्तातच नाही , आपली सत्ता ही आपल्या तळीरामांच्या घरात गेली की मग आपली तुतारी वाजवतील असला यांचा कुजका विचार त्यात पुन्हा राजकारणात पुतण्या पाहिजे , कन्या तर पाहिजेच पाहिजे हे काय कमी म्हणून विश्व विद्यापीठाचे आधुनिक कुलगुरू रोहित पवार तर हवे आहेत , कारण रोहितदादाला भविष्यात या विश्वात सोडा ब्रम्हांडात कधी काय आणि नेमकं कोणत्या वेळी घडणार आहे याची इंतभूत माहिती असते म्हणून ज्यांनी कधीच साधा विटी दांडू खेळला नाही ते थेट आजोबांचे बोट पकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष बनतात , शिवाय या असोसिएशन मध्ये तितक्याच तोडीसतोड असणारे सवंगडी निवडतात त्यावेळी ज्यांनी कधीकाळी या असोसिएशनची धुरा सांभाळली त्या ज्ञानेश्वर आगाशें पासून सातारच्या सुधाकर शानभाग असो किंवा सुरेश महाजनी असो यांची मान शरमेने खाली जात असेल , अर्थात ज्ञानेश्वर आगाशे आज हयात नसले तरी ते जिथे कुठे असतील तिथून त्यांचा पवारसाहेबांच्या नावाने अखंड जप सुरू असणार यात काही शंकाच नाही .
राजकारणावर लिहिता लिहिता माझी रेल्वे न झालेल्या बारामतीच्या स्टेशनवर थांबली असो , तर या लोकसभा निवडणुकीत शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांच्या गटाला सर्वाधिक जागा मिळतात का ॽ ओरिजनल अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक या सोबत मतांची टक्केवारी किती मिळते तीच गोष्ट शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आहे त्यामुळे यापैकी जो ही राजकीय शर्यत जिंकेल तोच खरा ‘ सिंकदर का बादशहा ‘ ठरणार आहे आणि हाच निकष सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे.

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे. मुंबई

============================

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.