निवृत्ती नामदेव दुपडे-जाधव यांचे 105 व्या वर्षी वार्धक्याने निधन

निवृत्ती नामदेव दुपडे-जाधव यांचे 105व्या वर्षी वार्धक्याने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई,
दिनांक22/5/2025 : कोळेगाव (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील प्रख्यात पशुवैद्यक सेवा मोफत पुरविणारे आणि धार्मिक वृत्तीचे वयोवृद्ध समाजसेवक निवृत्ती नामदेव दुपडे-जाधव (वय वर्षे 105 वर्षे) यांचे वार्धक्याने राहते घरी बुधवार दिनांक 21 रोजी सकाळी 11 : 20 वा. निधन झाले. अखंड 80 वर्षे उत्तम प्रकारे त्यांनी त्यांच्याकडे घेऊन येणाऱ्या पशूंची तज्ञ पशु वैद्यकाप्रमाणे सेवा करून त्यांना बरे केले. त्यांच्या पश्चात 2 मुली, 1 मुलगा, सून, तीन नातवंडे असा परिवार आहे.
कै. निवृत्ती नामदेव दुपडे-जाधव यांचा तिसरा शुक्रवार दिनांक 23 रोजी सकाळी ठीक 7 वा. कोळेगाव स्मशानभूमी येथे आहे. कोळेगाव येथील त्रिवेणी संगम देवस्थानचे सर्वेसर्वा ह.भ.प. दत्तात्रय निवृत्ती दुपडे महाराज यांचे ते वडील होत. समाजसेवक निवृत्ती नामदेव दुपडे-जाधव यांच्या अकस्मात निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.