शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व एनयूबीसी,च्या युवक प्रदेश अध्यक्षपदी अंकुश भास्करराव काळे पाटील यांची नियुक्ती…

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व एनयूबीसी,च्या “युवक प्रदेश अध्यक्षपदी”अंकुश भास्करराव काळे पाटील यांची नियुक्ती…
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 23/05/2024 :
संपूर्ण भारताचे ३६ राज्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ३९ लाखांहून अधिक सभासद नोंदणी असलेली, तसेच भारताच्या देश पातळीवर ५३ लाखांहून अधिक शेतकरी सभासद असलेल्या शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व एनयूबीसी, अर्थात राष्ट्रीय पिछडा वर्ग संघटनेच्या “प्रदेश युवक अध्यक्षपदी”अंकुश भास्करराव काळे पाटील,, यांची दिनांक २३ मे रोजी पुणे येथील राष्ट्रीय कार्यालयात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांच्या नेतृत्वाखाली, संघटनेचे राष्ट्रीय सदस्य व महा ऍग्रो चे महाराष्ट्र प्रदेश डायरेक्टर दत्ताजी आवारी, राळेगण सिद्धी यांच्या उपस्थितीत अंकुश काळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांच्या राज्य आणि राष्ट्र पातळीवरील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीचे उभारलेल्या आंदोलन आणि लढ्याने भारत देशातच नव्हे तर जागतिक पातळीवरील पक्ष संघटनांनी नोंद घेतलेली होती! श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांचे अकस्मित निधनानंतर त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्याची पूर्तता करण्यासाठी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी समर्थपणे सांभाळून संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत ५३ लाखान हून अधिक ऑनलाईन सभासदाची नोंदणी केलेली एकमेव शेतकरी संघटना आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महा ऍग्रो फार्मफूड सोलुशन फार्मर पुरस्कार कंपनी लिमिटेड महाराष्ट्र राज्याची स्थापना केल्याच्या नंतर महा ऍग्रो ने राज्य व राष्ट्रीय पातळीवर ८० हजाांपर्यंत सभासद नोंदणी केली असून संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. असे या राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असलेल्या संघटनेच्या व एन यू बी सी च्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्षपदी राजगुरुनगर चाकण येथील युवक शेतकरी, “अंकुश भास्करराव काळे पाटील,, यांची नियुक्ती आज संघटनेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती संघटनेचे प्रदेश प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत नायकुडे, डॉ बळीराम जाधव, ए एम खान, प्रदीप दिव्यवीर व संघटनेचे प्रदेश उपसचिव मेजर सुभाष वाळुंज, पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वर्पे पाटील व संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष व प्रदेश प्रभारी युवक अध्यक्ष राणा प्रेमजीतसिंह पवार यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कि शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ आणि एन यू बी सी अर्थात राष्ट्रीय पीछडावर्ग अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघ राज्य व राष्ट्रीय पातळीवर लाखो सभासद असलेली सर्वात मोठी संघटना आहे. या देशपातळीवर शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे ५३ लाख तर एन यू बी सी चे ८० लाखा हून अधिक सभासद असल्याची माहिती संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.