“ग्रामीण भागामध्ये भावकी- गावकी, बांध-भाव, शेजा -पाजारी आपल्या भांडणाचा राग काढताहेत मुला मुलींच्या शैक्षणिक व नोकरीच्या क्षेत्रावर”
“ग्रामीण भागामध्ये भावकी- गावकी, बांध-भाव, शेजा -पाजारी आपल्या भांडणाचा राग काढताहेत मुला मुलींच्या शैक्षणिक व नोकरीच्या क्षेत्रावर”
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
पिलीव प्रतिनिधी, दिनांक 27/10/ 2024 :
आजच्या युगामध्ये नोकरी मिळणे ही खूप कठीण बाब झालेली आहे. त्यातूनही ग्रामीण भागातील पालक आपल्या मुला मुलींच्या भवितव्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होऊन वाटेल त्या संकटाशी सामना करत आपल्या मुला मुलींना शासकीय सेवेत भरती करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठी जिद्द बाळगून वाटेल तो त्रास सहन करत स्वतःच्या पायामध्ये तुटकी चप्पल, अंगात फाटकी कपडे अडकवून आपल्या मुला मुलींच्या शैक्षणिक गरजा भागवत नोकरीची दिवा स्वप्ने रंगवत असतात. मुले मुली सुद्धा आपल्या आई-वडिलांचे कष्ट आणि ससेहोलपट डोळ्यासमोर ठेवून भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस अभ्यास करून आपल्या जीवनरुपी गाडीला योग्य मार्ग स्वीकारत आई-वडिलांची सुख स्वप्ने व भविष्यात सत्यात उतरवण्यासाठी वाटेल त्या प्रयत्नांची शिकस्त करीत असतात. परंतु ग्रामीण भागामध्ये भाऊकी-गावकीच्या व बांध-भाव, सेजा -पाजारी आपल्या भांडणाचा राग द्वेषा पोटी त्या निष्पाप युवा युवतीवर काढत खोट्या तक्रारी करून सूड घेण्याचे प्रकार ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. ही बाब चिंतनीय असल्याचे एका ग्रामीण भागातील वयोवृद्ध पालकांने नाव न सांगण्याच्या अटीवरती कथन करीत अश्रूंचा पाऊस पाडला. अशा घाणेरड्या प्रवृत्तीच्या लोकांच्या खोट्या तक्रारींची कोठेही दखल घेऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व अशा घाणेरडा वृत्तीच्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालावा अशी अपेक्षा व्यक्त केली.