कल्याण पश्चिम येथे मोहन प्राईड रहिवासी संघा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कल्याण पश्चिम येथे मोहन प्राईड रहिवासी संघा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 04/05/2024 :
कल्याण पश्चिम येथील पोदार स्कुलजवळ, वायले नगर, येथे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोहन प्राईड रहिवासी संघ यांच्या वतीने साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी संकुलाच्या गेटवर सर्वप्रथम प्रतिम जाधव आणि प्रेरणा जाधव या दांपत्या च्या हस्ते बाबासाहेबांच्या मूर्तीला पुष्पमाला अर्पण करून त्रिसरण पंचशील सामुदायिक ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोहन प्राईड मधील एसी कम्युनिटी हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात कवी प्रतिम जाधव यांच्या तीन कविता सादर झाल्यानंतर काही वक्त्यांची ओघवती भाषणे झाली. डॉ निशिकांत येलवे यांनी बाबासाहेब आणि त्यांचे तीन गुरू या विषयावरील अभ्यासपूर्ण भाषण झाले. प्रमुख वक्ते डॉ प्रा सिद्धार्थ मोरे यांनी उपस्थित स्वतःला मंत्रमुग्ध केले. आणि सोबत ज्येष्ठ कवी वामन दादा कर्डक याच्या कविता गाऊन बाबासाहेबांच्या आठवणी जाग्या केल्या.
याप्रसंगी संबोधी राज बाळदकर हिने अण्णा भाऊ साठे यांच्या ‘बुद्धाची शपथ’ या कथेचे साभिनय वाचन केले.
या प्रसंगी सुमधुर बुद्ध भीम गीते उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात गायली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज बाळदकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विद्या शिर्के बाळदकर यांनी केले.
बुके ऐवजी एक गुलाबाचे फुल आणि सोबत एक पुस्तक देण्यात यावे, ही कवी जाधव यांची कल्पना साऱ्यांना पसंत पडली.हा जयंती सोहळा यशस्वी होण्यासाठी डॉ. निशिकांत येलवे, डॉ. देवेंद्र धोपटे, डॉ. रुपाली धोपटे, डॉ. जीवक घाडगे,डॉ. प्रदीप घनघाव,डॉ. बालाजी सातपुते, अरुण गवळे, अस्मिता उबाळे, प्रशांत बागले, राज बाळदकर, डॉ. विद्या शिर्के बाळदकर आणि संकुलातील रहिवाश्यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर जयंती करीता विशेष उपस्थिती त्रिरत्न बौध्द महासंघाच्या धम्मचारीणी गुणराशी यांची लाभली.