विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म| भेदाभेद भ्रम अमंगळ॥

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म| भेदाभेद भ्रम अमंगळ॥
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/04/2024 :
सध्या महाराष्ट्रातील काही धर्ममार्तंड समाजामध्ये मतभेद करण्याचा प्रयत्न करीत आहे समाजामध्ये टीकात्मक विचार मांडून समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न चालू आहे वास्तविक पाहता संत उक्ती प्रमाणे आपला महाराष्ट्र संत महंतांच्या कर्तुत्वाने सिद्ध झालेला आहे अनेक संत महंत महाराष्ट्रात जन्माला आले विविध जातीतील विविध पंथातील संतांनी समतेचा बंधुत्वाचा संदेश दिलेला आहे महाराष्ट्रातील थोर संत तुकाराम महाराज या ठिकाणी जातीभेदाच उच्चाटन करतात ते असे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म| भेदाभेद भ्रम अमंगळ॥ किंवा या रे या रे लहान थोर| याती भलती नारीनर किंवा चहू वर्णास नामाधिकार| नामी नाही जडमूड| पैलंपार| पावती नामे किंवा कोणाही जीवाचा न घडो मत्सर| वर्म सर्वेश्वर पूजनाचे।॥ असा संदेश आहे म्हणून वारकरी संप्रदायातील तमाम वारकरी बंधूंनी आज विचार करण्याची गरज आहे सर्वधर्मसमभाव राखणे गरजेचे आहे म्हणून वेळीच वारकरी संप्रदायाने आज अतिशय अंतकरण पूर्वक या महाराष्ट्रात खरं काय आणि खोटे काय फसविरी काय धर्माच्या नावाखाली समाजाला वेगळं प्रलोभन दाखवून समाज बिघडवण्याचा काही लोक करीत प्रयत्न आहेत तरी आपल्या संत लेखनाप्रमाणे आपण जातिभेद न करता जे सत्य असेल ते समाजापुढे मांडावे आणि जे जुमले गिरी करतात फसवतात अशांना जागा दाखवून आज या निवडणुकीद्वारे लोकसभेमध्ये जे धर्मभेद मानतात धर्माची अनेक वक्तव्य करतात अशांचा विशेष करून आपण विचार करून यावेळेस वारकरी संप्रदायातील समस्त वारकरी बंधूंनी आपल्याला आज संत लेखणीतून तयार झालेलं जे संविधान आहे त्या संविधानाचा मान राखून आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनःपूर्वक विचार करून आपण आपले मत ज्या पक्षांमध्ये जातीभेद मानला जात नाही धर्मभेद मानला जात नाही अशा पक्षाला मतदान करून देश व देशाचे संविधान अबाधित ठेवणे गरजेचे आहे. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार अध्यात्मिक वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी आध्यात्मिक वारकरी आघाडी यातील सर्व जिल्हाध्यक्षांनी व सर्व कार्यकर्त्यांनी आपले विचार तळागाळात वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना व इतरांना समजावून सांगून आपलं विचार बळकट करा अशी अध्यात्मिक वारकरी आघाडी शरद पवार पार्टी यातील सर्व कार्यकर्त्यांनी आपले विचार प्रकट करून सर्व वैचारिक पातळीचा अवलंब करून आपले सत्कार्य करावे ही सर्वांना हात जोडून विनंती
ह.भ.प.मोहनानंद महाराज पुरंदावडेकर
राज्य उपाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी अध्यात्मिक वारकरी आघाडी