संग्रामनगर येथे श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी महोत्सव संपन्न

संग्रामनगर येथे श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी महोत्सव संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/04/2024 :सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर अकलूज येथील श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिरात भगवान श्रीराम प्रभूंचा जन्मोत्सव विविध सामुदायिक उपासना व उपक्रमाने संपन्न झाला.
चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते श्रीराम नवमी पर्यंत नऊ दिवस रोज पहाटे पाच ते सहा वाजता श्रीं ची काकड आरती तसेच ” श्रीराम जयराम जय जय राम ” या सिध्दतारक मंत्राचा अखंड जप, दुपारी विविध भजनी मंडळाची सुश्राव्य भजन सेवा, रोज सायंकाळी ६:३० ते ८:३० वाजता सामुदायिक स्वरूपात श्रीराम रक्षा स्तोत्राची सलग तेरा अवर्तन घेण्यात आली.
गुढी पाडव्याच्या दिवशी पहाटेच्या काकड आरती नंतर सकाळी ६:०० ते ७:३० वाजता कु.ईश्वरी धनंजय यादव यांच्या शुभहस्ते दुग्ध रूद्राभिषेक संपन्न झाला व श्रीराम नवमीच्या नवरात्रीच्या कलशाची स्थापना करण्यात आली.गुडी पाडवा ते श्रीराम नवमी पर्यंत रोज पहाटे काकड आरती,अखंड जप व ७० भाविकांच्या श्रीराम रक्षा आवर्तने या उपासनेमुळे संग्रामनगरचे वातावरण राममय झाले होते.
श्रीराम नवमीच्या दिवशी पहाटेची काकड आरती नंतर सकाळी ६:०० ते ७:३० वाजता सौ.व.श्री.अभय सुभाष जोशी यांच्या शुभहस्ते श्रीरामांच्या मुर्तीस, श्री दत्तात्रय व श्रीकृष्णाच्या मुर्तीस दुग्ध रूद्राभिषेक संपन्न झाला.सकाळी ८:०० ते १०:०० या वेळेत श्रीराम कृपा भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला.व सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत किर्तनाचा कार्यक्रम झाला.किर्तन विशारद
ह.भ.प.सौ.गायत्रीदेवी जामदार याचे श्रीराम जन्मावर नारदीय किर्तन संपन्न झाले.दुपारी १२:३० वाजता पुष्पवृष्टी होऊन त्यानंतर पाळणार गायन व आरती करण्यात आली.दुपारी १:०० ते ३:०० वाजेपर्यंत सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.अशी माहिती सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज विश्वस्त मंडळाने दिली.