ताज्या घडामोडी

⭕मागण्या मान्य न केल्यास 28 नोव्हेंबरला मंत्रालयाला घेराव : रविकांत तुपकर

⭕मागण्या मान्य न केल्यास 28 नोव्हेंबरला मंत्रालयाला घेराव :
रविकांत तुपकर यांचा एल्गार

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharastra State, India.
Mo. 9860959764.

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 21/11/2023 :
27 नोव्हेंबर पर्यंत विविध मागण्या सरकारने मान्य न केल्यास 28 नोव्हेंबरला मंत्रालयाला घेराव घालणार असा इशारा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातील जाहीर सभेत दिला.
महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलने व मोर्चे होत असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध शेतकरी संघटनांचे माध्यमातून युवा नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली पाच नोव्हेंबर पासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एल्गार महामोर्चा चे आयोजन केले होते. या एल्गार मोर्चाची सांगता सभा दिनांक 20 नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर ऑफिस वर धडक मोर्चा काढत झाली. यावेळी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक समन्वयक विठ्ठल राजे पवार यांचे व प्रख्यात कीर्तनकार ह भ प पुरुषोत्तम महाराज भुतेकर यांच्या हस्ते रविकांत तुपकर यांचा शेतकरी पगडी चाबूक शाल व संघटनेची स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला तसेच रविकांत तुपकर यांची शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले यावेळी लाखो उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडात मध्ये तुपकर यांचे अभिनंदन केले.
अशी माहिती संघटनेचे प्रदेश कार्यकारणी समितीचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील यांनी पत्रकारांना दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष व बुलढाण्याचे प्रख्यात किर्तनकार हभप पुरुषोत्तम महाराज भुतेकर यांच्या हस्ते, नूतन प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघ़टनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समन्वयक- विठ्ठल दादा राजे पवार यांनी बुलढाणा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी संघटनेचे राज्यातील सर्व जिल्हा विभागीय अध्यक्ष व राज्य पदाधिकारी कार्यकारिणी समिती प्रदेश अध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे छत्रपती संभाजी नगर अध्यक्ष काशिनाथ जाधव, जालना जिल्ह्याचे अध्यक्ष योगेश कदम, मराठवाड्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रदीप दिव्यवीर, जालना जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष वंदना खांडेभराड, हिंगोली चे अध्यक्ष मारुती चोपडे, अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष पंढरीनाथ कोतकर, नाशिक नगर विभागाचे अध्यक्ष जगन्नाथ कोरडे पाटील नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संदीप गंणगे, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल भांडवलकर, उपाध्यक्ष बाळासाहेब वर्पे पाटील, सोलापूर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड, उस्मानाबाद, वाशिम, यवतमाळ, नागपूर, लातूर, नांदेड, परभणी, मुंबई, ठाणे, कोकण विभागाचे प्रमुख, उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख, मराठवाड्याचे प्रमुख, पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख सर्व पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कर्नाटक राज्यातील रयतू शेतकरी संघटना व हरित सेनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार, छत्रपती शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, कुलकर्णी काका, आधी 30 ते 40 संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी यावेळेस महा एल्गार मोर्चाला समर्थन करण्यासाठी व रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ लाखोच्या संख्येने उपस्थित होते.
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी रविकांत भाऊ तुपकर यांची महाराष्ट्र राज्याचे शेतकरी आंदोलनाचे सरसेनापती पदी नियुक्ती तसेच त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची नियुक्ती सन्मानपत्र देऊन सत्कार केला.
दिनांक २० नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे झालेल्या महा एल्गार मोर्चाच्या सांगतात सभेत विविध मागण्यांचे निवेदन जिल्ह्याचे कलेक्टर व राज्य सरकारला दिलेले असून सदरच्या मागण्या 27 नोव्हेंबर पर्यंत मान्य न केल्यास 28 नोव्हेंबरला मंत्रालय बंद करण्यात येईल अशी घोषणा यावेळी तुपकर यांनी केली त्याला उपस्थित शेतकऱ्यांनी मान्यता देत 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाला मंत्रालयात आमदार खासदार व मंत्री यांना नो एन्ट्री करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून 27 नोव्हेंबरच्या रात्री हजारोच्या संख्येने शेतकरी मुंबईकडे गनिमी काव्याने घौड दौड करून सरकारला जेरीस आणतील आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेतील असा इशारा यावेळी रविकांत भाऊ तुपकर यांनी दिला. मागण्यांं मध्ये सोयाबीन, कापूस, ऊस दूध दर इत्यादी विविध 15 मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button