श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री राम कथा सोहळ्याचे पांगरी येथे आयोजन

श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम कथा सोहळ्याचे पांगरी येथे आयोजन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/04/2024 :
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पांगरी येथील श्रीराम पेठ येथे दरवर्षीप्रमाणे श्रीराम नवमी निमित्त श्री संत शिवाजी महाराज बोधले, श्री संत मानकोजी महाराज बोधले यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य हभप नारायण बोधले महाराज गौरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र शुद्ध 4 शके 1945 शुक्रवार दिनांक 12/4/2024 ते गुरुवार दिनांक 18 /4 /2024 या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात ह भ प शुभम महाराज वसंतगडकर घाटनांदुर तालुका भूम, ह भ प गुरुवर्य नारायण बोधले महाराज गौरकर, ह भ प विलास मुळे महाराज जुनोनी, ह भ प श्रीनिवास महाराज जगताप पालशिंगणकर संस्कृत नेट पुणे, ह भ प भाऊसाहेब महाराज कदम घाटणेकर, ह भ प ज्ञानेश्वर पाटील महाराज बावीकर, ह भ प माधव महाराज बोधले गौरकर( काल्याचे किर्तन) यांची दैनंदिन अनुक्रमाने कीर्तन सेवा होणार आहे.
दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे चार ते सहा काकडा, सकाळी 9 ते 11 गाथा भजन, दुपारी 2 ते 3 महिला भजन, 4 ते 6 श्रीराम कथा, 6 ते 7 हरिपाठ, रात्रौ 9 ते 11 कीर्तन, रात्रौ 11 ते पहाटे 4 हरीजागर होईल.
श्रीराम कथा सोहळ्याचे प्रवक्ते ह भ प रामायणाचार्य विनोदजी महाराज कुलकर्णी बावी यांना गायक ह भ प सिताराम महाराज कदम, हार्मोनियम गुलाब महाराज सोनवणे, तबला अभिजीत कदम यांची साथ संगत होईल.
*गुरुवार दिनांक 18/4/2024 रोजी संध्याकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत ह भ प महादेव शेंडे महाराज वेळापूर यांचा सोंगी भारुड कार्यक्रम होईल.
*या सप्ताहाच्या प्रारंभी रमेश गरड व सिताजी गवळी यांच्या हस्ते गाथा पूजन, साहेबराव पवार, निवृत्ती जाधव यांच्या हस्ते कलश पूजन, मुरलीधर जाधव, रामचंद्र जाधव विना पूजन, अरविंद चव्हाण, दिलीप लाडे, खंडू पवार ध्वज पूजन, टाळ पूजन रामलिंग जाधव, शिवाजी शेळके, एकनाथ पवार. श्रीराम मित्र मंडळ व भजनी मंडळ श्रीराम पेठ पांगरी मृदुंग पूजन, मुरलीधर जाधव, बळीराम जाधव, राजेंद्र काकडे हे हरिपाठ व काकडा नेतृत्व करतील. श्रीरंग महाराज, सिताजी गवळी हे विना नेतृत्व करतील.
🟢सप्ताहातील सकाळ व संध्याकाळचे अन्नदाते याप्रमाणे चिंतामणी दत्तात्रय चव्हाण व राजेंद्र गणपत चव्हाण, संजय मधुकर देशपांडे व रामलिंग रघुनाथ जाधव, बबन ज्ञानबा गरड व नानासाहेब राजेंद्र गायकवाड, शशिकांत बापू सुतार व अशोक बलभीम गरड, भीमराव सदाशिव चव्हाण व दिपक विजय शेळके, रमेश माणिक मुळे व अनिल धनाजी भोसले तर काल्याचा महाप्रसाद निवृत्ती सुबराव जाधव, साहेबराव नारायण पवार, सिताजी रामा गवळी, अंकुश रामा गवळी, एकनाथ ज्ञानोबा पवार, विलास मुरलीधर जाधव, यांचा सामूहिकपणे होईल.
*दिनांक 22/4/2024 रोजी हनुमान जयंती निमित्त शशिकला कोळगे, ह भ प दादाजी मेटकरी सांगोला, ह भ प तानाजी मदने यांचा भारुड कार्यक्रम संध्याकाळी आठ ते एक वाजेपर्यंत होईल.
*दैनंदिन ज्ञानेश्वरी पारायण हभप पद्माकर नारकर पांगरी हे करतील अशी माहिती श्रीराम तरुण मंडळ यांच्या वतीने सांगण्यात आली. या धार्मिक सोहळ्यानिमित्त चंद्रकांत जाधव 960 423 31 75, नाना चव्हाण 98 81 24 18 94, एकनाथ पवार, बळीराम लाडे यांच्याशी संपर्क साधावा.
बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 11 वा. श्रीराम तरुण मित्र मंडळाच्या वतीने श्रीराम पालखी सोहळा होणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्वांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.ज