लोकसभेनंतर चारशेपार अन् शिवसेना व राष्ट्रवादी तडीपार ?

लोकसभेनंतर चारशेपार अन् शिवसेना व राष्ट्रवादी तडीपार ?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 03/04/2024 :
काय आहे आजकाल बातमीदारांच्या दुनियेत इतके अवलादी स्वयंभू पत्रकार झालेत की काय विचारूच नका त्यामुळे यापूर्वी पावसाळ्यात तेलकट कागद लावून चिलट घालवायचा प्रकार होता अर्थात आजही तो आहे अगदी तशीच अवस्था काही तकलादू पत्रकार मंडळींची झाली कारण त्यांच्या चलनी कागदाला सुध्दा तेल लावावे लागते , अर्थात त्यांना निवडणूका म्हणजे मेजवान्या असतात हे काय नव्याने सांगण्याची गरज नाही , कारण चिरकूट पत्रकारांची खानावळ कोणत्यातरी गावठी पुढाऱ्याला घेऊन चालू असते . त्यामुळे कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतील बेरोजगारी वाढली तर पकोडे तळा त्यापेक्षा माझ्या मते चिरकूट पत्रकार व्हा ! आणि निवडणूका ते निवडणूका असा पांढरपेशी व्यवसाय करा त्यात काही गैर नाही फक्त ते पकोडे तळणारे जसे पोटार्थी असतात तसे हे चिरकूट लाभार्थी असले पाहिजेत अर्थात जसे चिरकूट पत्रकार असतात तसे राजकीय नेते सुध्दा असतात त्यामुळे त्यातील अनेकजण निवडणूकांच्या जंजाळात सतत लाभार्थी या नात्याने कायमच अडकलेले असतात .
तर आपला आजचा विषय मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर श्रध्दा असणाऱ्यांचा नाही तर तो येत्या लोकसभा निवडणुकीत एनडीए चारशेपार करण्याचा आहे त्यामुळे सचिन तेंडुलकर नाराज तर होणार नाही ना ? कारण त्याने आजपर्यंतच्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत कधीच इतका मोठा पल्ला गाठला नाही कारण त्याने काळजाचा ठोका चुकवणारी गोलंदाजी 🎳 भिडलेली आहे पण इकडे तर सगळाच डामडौल आहे , परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र मागील दहा वर्षात असे कोणतेही अनभिषिक्त सम्राट विरोधक म्हणून त्यांच्या वाट्याला आले नाहीत तर चिरकूटपणा करुन मोदींच्या हाती कोलीत देणाऱ्या विरोधकांचा त्यांना सामना करावा लागला अर्थात तो काही अटीतटीचा सामना नव्हता तर तो ‘ नुरा कुस्ती ‘ चा एक प्रकार होता तर अशा परिस्थितीत मोदींनी ‘ अब की बार चारशे पार ‘ चा नारा दिला असला तरी त्यात त्यांना किती यश मिळेल यावर खल होऊ शकतो याचा अर्थ मोदींना ही लांब पल्ल्याची शर्यत गाठताना नक्कीच नाकीनऊ येणार आहे किंबहुना त्यात ते सपशेल अडखळत अडखळत कसेबसे साडेतीनशे पर्यंत जातील , कारण महाराष्ट्रात तर त्यांच्या शिवसेना व राष्ट्रवादी या दोन मित्रपक्षांनी काही जागांसाठी अडेलतट्टूची तर काही जादा जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे त्यामुळे भाजपची आजची परिस्थिती ‘ धरलं तर चावतय अन् सोडलं तर पळतयं ‘ अशी केविलवाणी झाली आहे पण या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना व राष्ट्रवादी या दोघांना त्याची व्याजासह किंमत मोजावी लागणार आहे याचा विसर या दोन पक्षातील स्वयंभू नेत्यांना पडला आहे त्यामुळे हा खेळ सावल्यांचा असा काहीसा प्रकार सुरू आहे .
राजकीय खेळपट्टीवर खेळणं आणि त्याहूनही टिकून राहणं जितकं जिकिरीचं आहे तितकंच किंवा त्याहूनही क्रिकेटच्या मैदानाची भाषा वेगळी नाही , हां त्यात ‘ अंतर सिर्फ नजरोंका हैं , क्योंकी जहाँ नजर हटी वहाॅं दुर्घटना घटी ! तो ऐसा हैं दोनोके बिचका फासला ‘ , तर सांगण्याच तात्पर्य काय की जे स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणवतात किंवा राजकीय डावपेच खेळतात त्यात कोण किती माहीर असतो ते तुम्ही जाणता कारण त्यात कोण निवडून येणार , कोण पडणार , कोणता पक्ष किती ठिकाणी आखाडा जिंकणार अशी सारी गणिते मांडली जात असताना तुम्ही मतदार मात्र चाणाक्षपणे कुणाचा पत्ता कसा कट होतो त्यापेक्षा काहीजण कुणाची किती आणि कधी पत्ती येती त्यावर डोळा ठेवून असतात , त्यामुळे हा देश पाकिस्तानी व्हायला लागलाय याचा अर्थ जातीने नव्हे तर राजकीय कंगालखोरीमुळे आता यावर उपाय तुमचा असला पाहिजे का नाही .
आता या फोलकट आणि पोरकट चर्चा बंद करून उपयोग आहे का ॽ कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या अजितदादा पवार व शरदचंद्र पवारसाहेब या काका – पुतण्याचा बाजार आपसूकच सत्ता पिपासूच्या मोहापायी उत्साहाचे औदार्य दाखवत ओढवून घेतला आहे परिणामी आता या बाजारी राजकारणातल्या मास्टर माईंड वाल्यांनी पॉवर गेम सुरू केला आहे त्यामुळे ते अटीतटीची लढाई करतील खरे पण त्यात काका मास्टर ब्लास्टर ठरणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे , अन् पुतण्याची शिट्टी विना दांडू भाजपवालेच गनिमी कावा करून नक्कीच काढणार यात काही शंका नाही .
अर्थात तोपर्यंत ठाण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहीहंडी कितव्या थरावर पोहचली याची चाचपणी भाजपकडून नक्कीच सुरू आहे कारण हा पक्ष जरी जातीभेद करणारा नसला तरी त्यात कायस्थ , कोकणस्थ , कऱ्हाडे आणि देशस्थ अशी एकापेक्षा एक डावपेच आखणारी तगडी फळी तयार आहे परिणामी फडणवीस साहेब यांनी त्यांच्या दिल्लीतील महागुरूंची जागा वाटपात शेवटचा हात फिरवताना मदत घेतली म्हणजे समर्पयानी होऊन जाईल नाही का ? कारण भाजप ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लचके तोडून चारशेपार करणार असेल तर ‘ जिकडेतिकडे आनंदी आनंदी गडे ‘ पण हाच सुहास मात्र या दोघांच्या नाकधुऱ्या काढण्यात इतका कमालीचा व्यग्र झाला आहे की काय विचारूच नका पण भाजप बुध्दी चातुर्य वाल्यांचा पक्ष आहे त्यामुळे हाता तोंडावर आलेली लोकसभा निवडणूक झाली रे झाली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काय किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काय ॽ तर या दोघांना भाजप अशा काय नाकदुऱ्या काढायला लावले की त्यांना ‘ भिक नको पण कुत्र आवर ‘ म्हणण्याची वेळ येणार आहे कारण या दोन पक्षांच समाजमनात नक्की किती स्थान आहे हे मतपेटीतून सिध्द होणार आहे , त्यामुळे एकदा का चारशेपार होवो अथवा न होवो पण हे दोन पक्ष भाजपवाले त्यांच्या बुद्धी चातुर्याच्या चौसष्ट घरातून असे काही तडीपार करतील की ‘ सिर्फ तुम देखतेही रह जावोगे’.
राजाभाऊ त्रिगुणे,
सातारा .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक