ताज्या घडामोडी

साताऱ्यात उदयनराजे विरूद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज ?

साताऱ्यात उदयनराजे विरूद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज ?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

अकलूज दिनांक 03/04/2024 :
महाराष्ट्रातील राजकारण कधी कोणत्या नावे वरून कुठल्या नावेवर जाईल आणि कोणती भरवशाची नाव हेलपटत हेलपटत कुठल्या किनाऱ्यावर पोहोचेल याचा काही नेम नाही , कारण आजपर्यंत महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पासून पोलादी पुरुष बाळासाहेब देसाई यांच्या सारख उत्तुंग व्यक्तिमत्व या मातीत जन्माला आलं पण त्यांनी या सातारच्या मातीला काय दिले ? हां तो काळ अति उच्चभ्रू आय .टी . क्षेत्रातील भला नसला तरी या नेत्यांना मुलाचे पाय पाळण्यात दिसले पाहिजे होते कारण ते तितके चाणाक्ष होते पण त्या लुकलुकणाऱ्या पायांना त्यांच्या यौवनात काही तरी करता येईल अशी तरतूद व्हावी असे वाटत होते पण नाही .
अशाच साऱ्या नेत्यांनी सातारचा भ्रमनिरास केला त्यामुळे नवजात पिढी पुण्यात स्थिर स्थावर झाली आहे किंवा यापुढे होणारच आहे पण याच सोयरसुतक ना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आहे ना युगपुरुष छत्रपती शिवाजीराजेंचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आहे , मग काय निवडणूका येतील आणि जातील पण यात माती मात्र सातारकरांनी खायची ही कुठली पद्धत यापुढे असं होता कामा याची दखल संभाव्य खासदारांची आहे आणि त्यात गैर तर सोडाच पण ती त्यांची व्यक्तिगत संसदीय सदस्य म्हणून जबाबदारी आहे पण आपण खुशाल चेंडू मतपेटीत टाकतो आणि ये रे माझ्या मागल्या सारखी वाट बघतो नाही का ॽ अर्थात ते तुम्ही ठरवा याचा अर्थ या सर्व घटना केवळ सातारसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे हेही तितकंच खरं आहे .
सातारकर म्हणजे झुकणारा ही जी प्रतिमा आहे ती आपण कधी बदलणार आहे का ॽ नाही त्यामुळे सातारकरांना विकासाचा लकवा मारला आहे का ॽ कारण आपण ज्यांच्यासाठी मतदान करतो ते प्रतिनिधी आजपर्यंत सातारचा आवाज का संसदीय कार्यप्रणाली मध्ये उचलत नाही ? फक्त इतक्या कोटींचा निधी आणला तितक्या कोटींची तरतूद केली पण हा सारा झोल गेला कुठे याचा हिशोब तुम्ही आम्ही कधी विचारणार आहोत का ॽ तर आता त्यासाठी समाजवादी मंडळींना विचारा अशी थातूरमातूर उत्तरे देताना आपण किती सर्जनशील आहोत याचा तर दाखला देत नाही ना कारण आपणच लोकशाही लोकशाही म्हणून गळा काढणाऱ्या विचारा असे बोलत तेच मुळात साखरेच्या पाकात कडू कारल्याची मिसळ केल्यासारखे आहे नाही का ?
लोकप्रतिनिधी हा जनतेतला आणि जनतेसाठी असायला हवा याबाबत तुमच मत काय ॽ पाच वर्षांनंतर मतपुजा करणारा लोकप्रतिनिधी काय कामाचा भले तो ग्राम पंचायत सदस्य असो वा लोकसभा सदस्य असो , यासाठी जनतेनं प्रश्नांचा भडीमार केला पाहिजे की आमच्या मुलभूत सुविधा सोडविण्यासाठी तुम्ही इतकं ना काम आणि तितकेच तकलादू का आहात ? त्यामुळे तुमच्या समोर मत मागायला येताना अनेकांची भंबेरी उडेल , कारण देशात असे अनेक पायलीला पाचशे चिंधीचोर आहेत आणि या चोरांना एकत्र करून भाजपवाले चारशे पारचा जयघोष करतायत , पण त्यांना त्यांच्या पक्षातून सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी द्यावी का ॽ हा प्रश्नच मुळात सातारकरांना सतावतोय कारण हा सातारकरांच्या भावनेशी खेळ मांडला जात आहे तथापि तोपर्यंत महाविकास आघाडीचा घोडा जोरात दौडत असून त्यांनी या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी पक्की केली असल्यात जमा आहे , त्यामुळे या मतदारसंघात बहुदा उदयनराजे विरूद्ध पृथ्वीराज बाबा यांच्यात दुरंगी थेट लढत होणार असं एकूण चित्र आहे.

राजाभाऊ त्रिगुणे,
सातारा .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button