ताज्या घडामोडी

सौ.दिशा चौकेकर हत्या प्रकरणी मोठ्या दैनिकांच्या पत्रकारांचे वस्त्रहरण

सौ.दिशा चौकेकर हत्या प्रकरणी मोठ्या दैनिकांच्या पत्रकारांचे वस्त्रहरण

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 01/04/2024 :
सौ.दिशा चौकेकर यांच्या हत्येचे उघड पुरावे सोशल मिडीयावरुन सार्वजनिकरित्या प्रसारीत होऊनही जिल्ह्यातील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्रांचे ते पत्रकार” कुणासाठी जिल्ह्यात निपक्षपातीपणे र्निर्भिड पत्रकारीता करीत आहेत?अशी चिरफाडड् मराठी सोशल मिडीया सिंधुदुर्ग च्या माध्यमातून सुनील पेडणेकर सावंतवाडी यांनी केली आहे.
“मेरा भारत महान” मिडीयाने ठेवला तो भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे गहाण ! असेच म्हणायची पाळी राष्टप्रेमी जनतेवर आली आहे? असा घणाघात प्रारंभीच त्यांनी केला आहे.
सरकारने जनतेच्या कराच्या पैशातून पोसलेले मंत्री आमदार आणि शासकीय भ्रष्ट अधिकारी हे दिशा चौकेकर या महीला शासकीय अधिकाऱ्यांची उघडपणे झालेली हत्या दडपण्यासाठीच का ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पत्रकार सीताराम गावडे, पत्रकार जय भोसले, पत्रकार समीर जळवी आणि पत्रकार सिंधुदुर्ग समाचार यांना दिशा चौकैकरची हत्या डोळसपणे दिसते ! पण….निर्भिड निपक्षपातीपणाचा आव आणणाऱ्या दै.तरुण भारत, दै.सकाळ, दै. रत्नागिरी टाईम्स, दै.पुढारी, दै. लोकमत अशा वृत्तपत्रांना ही हत्या उघडपणे झाल्याचे पूरावे सोशल मिडीयावर प्रसिध्द होऊनही सत्य जनतेसमोर आणण्यासाठी या वृत्तपत्रांच्या पत्रकारांना नक्की कुणी रोखले आहे! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिडीया नक्की आहे कुणासाठी ? एका शासकीय अधिकारी असलेल्या महीलेचा दिवसाढवळ्या झालेला खून लपविण्यासाठी की, गून्हेगाराला सहाय्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी ? अशीही त्यांनी जाहीर विचारणा केली आहे.
सिंधुदुर्गात दिवसाढवळ्या खुद्द दिपक केसरकर ;मंत्रीमहोदयांच्या मतदारसंघात ते तेथे दौऱ्यावर असताना शासकीय महीला अधिकाऱ्यांच्या खूनाचा तपास होऊ नये यासाठी एफ.आय.आर. नोंदविण्यास विरोध होतो पण..
दिपक केसरकर म्हणतात म्हणून जिल्ह्यात दहशत दहशत म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिडीया वृत्तपत्रांची पहीले पुष्ठे भरभरुन बातम्या प्रसिद्ध करतात आणि तेच दिपक केसरकर पलटी मारतात, पण ही जिल्ह्यातील मिडीया चिडीचूप?आहे ना सिंधुदुर्गातील मिडीयाची प्रामाणिकपणा? असाही आरोप केला आहे.
जिल्ह्यातील मिडीयामुळेच सर्वसामान्यपणे जनतेला रोज अन्याय अत्याचार सहन करावा लागत आहे ? दिशा चौकेकर महीला शासकीय अधिकारी हत्या प्रकरण हे त्यातीलच एक जीवंत उदाहरण?
सिंधुदुर्गातील मिडीया सक्षम प्रामाणिक नसल्यानेच जिल्ह्यातील 25 पेक्षा जास्त हत्यांचा पोलीस तपास लागलेला नाही!
सोशल मिडीयावरुन कोकण लाईव्ह चँनेलवरुन दिशा चौकेकरची हत्या उघडपणे झाल्याचे फोटाग्राप्स पत्रकार सीताराम गावडे यांच्यासारखे होनहार निर्भिड पत्रकार प्रसिध्द करतात आणि जिल्ह्यातील मिडीया अशा गंभीर घटना दडपण्यासाठी प्रयत्न करते तेव्हा!
पत्रकारांच्या जिल्ह्यात वाढत चाललेल्या मालमत्ता बंगले आधुनिक वातानूकूलीत कारगाड्या,दूकान गाळे.डंप्पर जमिनी यांची चौकशी झाल्याखेरीज दिशा चौकेकर हत्या प्रकरणात हे पत्रकार लक्ष घालणार नाहीत !
लोकसभा निवडणूका लागल्या आहेत. आता काही पत्रकारांच्या भूरट्या टोळ्या मंत्री केसरकरांच्या दरवाजावर लाळ ओकत घुटमळताना जनतेला दिसणार आहेत?
जनाची तर नाहीच, पण मनाचीही लाज नसलेल्या काही भुरट्या पत्रकारांना स्वार्थापोटी कशाच्याही लाजा वाटत नाहीत. जाहीरातींसाठी हपापलेले पत्रकार यानी तर जाहीरातींच्या नावावर लाचारी करत पत्रकारीताच गहाण टाकून पूरस्कारप्राप्त पत्रकार म्हणून मिरविणाऱ्या पत्रकारांना एका शासकीय महीला अधिकाऱ्यांच्या हत्येपेक्षा मंत्रीमहोदयांनी थुंकलेली थुंकीसुद्धा हातात घ्यावीशी वाटते. तेव्हा माणूसकी संपल्याचेच चित्र पहायला मिळते! सध्याच्या पत्रकारितेचे आणि त्या करणाऱ्या पत्रकारांचे पुरते वाभाडे त्यांनी खुलेआम काढले आहेत.
राजकीय सामाजिक क्षेत्रात वावरताना पत्रकारीतेतील विकृतीला छेद देऊन सामाजिक क्षेत्रात माणूसकीला महत्व देत मोठा संघर्ष उभा करुन प्रसंगी कडक उन्हात उपोषणे आंदोलने करुन मोर्चे काढून सामाजिक बांधिलकी जोपासली चूकीच्या प्रवृत्तीला भ्रष्ट पत्रकारीतेकडून प्रोत्साहन मिळू लागल्याने त्याकाळात सोशल मिडीया नसल्याने पदरमोड करुन प्रसिध्दपत्रके काढून जनतेसमोर सत्य आणले पण स्वार्थापोटी आपली नैतिक नितीमुल्य बासनात गुंडाळून पत्रकारीताच स्वतःच्या अस्तीत्वासह गहाण टाकून त्यागातून पत्रकारीता जीवंत ठेवलेल्या सन्माननीय दिवंगत पत्रकारांच्या नावे पत्रकार पुरस्कार घेणारे समाजातील भामटे सत्य दडपून जनतेसमोर खोट प्रसिध्द करुन पुरस्कारप्राप्त पत्रकार म्हणून मिरविताना आपण सर्वच क्षेत्रातील लोक पहात बसलो आहोत आणि याचाच नेमका फायदा उठवित हे भामटे कुणालाही सहजपणे ब्लँकमेल करीत आले आहेत. आता तर यांचे मनोधैर्य वाढतच चालले आहे. मंत्री, खासदार, आमदार यांचा हातच या भामट्या पत्रकारांच्या टोळीच्या डोक्यावर असल्यानै सत्य समाजासमोर येऊच नये यासाठी भामट्या पत्रकारांची टोळकी एकत्रित पणे फीरताना दिसू लागली आहेत.
आता तर वेगुर्ला येथे दिवसाढवळ्या महीला शासकीय अधिकाऱ्यांचा उघडपणे खून झाला आणि हे खून प्रकरण दडपण्यासाठी मंत्रीमहोदय वेगुर्ला येथे उपस्थीत असताना वेगुर्ला पोलीस निरिक्षक एफ.आय.आर.नोंदविण्यास विरोध करतात याचा अर्थ प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थी देखील सांगू शकेल हे सर्व सुरु असताना वेगुर्ल्यातील पत्रकार शिक्षणमंत्र्यांना गराडा घालून उभे रहातात पण महीला शासकीय अधिकारी असलेल्या दिशा चौकेकरच्या हत्या झालेल्या मृतदेहाची साधी पहाणी करण्यासाठी,वेगुर्ला येथील एकही पत्रकार दिवसभर येथे फिरकू शकत नाही यामुळे पत्रकारीचेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह तर उभ राहतेच आहे पण एका निष्पाप भगिनीची हत्या दडपण्यासाठी पूरस्कारप्राप्त पत्रकार सुपारी घेतल्याप्रमाणे पत्रकारीतेचे व्रत पार पाडत असतील तर या पत्रकारांना ज्यांच्या दिवंगत त्यागी पत्रकारांचे नावाने पत्रकार पुरस्कार दिले आहेत ते दिवंगत त्यागातून पत्रकारीता करणाऱ्याच्या स्मृती स्वर्गातून अशा पत्रकारांच्या नावाने ढसाढसा रडत स्वर्गातून अश्रु ढासळत आहेत.तरीही या पत्रकारीतेला सत्याची चाड राहीलेली नाही आणि म्हणूनच या पत्रकार राजकीय नेत्यांचे बुरखे फाडण्यासाठीच मयत दिशा चौकेकर प्रकरणी आता राज्य मानवी हक्क आयोगाकडूनच सत्य जनतेसमौर येणारच ? असेही ठामपणे शेवटी नमूद केले आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button