अखेर काॅंग्रेसने उध्दवांच्या फाटक्या वाकळेत पाय घातलाच

अखेर काॅंग्रेसने उध्दवांच्या फाटक्या वाकळेत पाय घातलाच
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/03/2024 :
लोकसभा निवडणूकीचा बिगूल कधीच वाजलाय पण या बिगूलातील तुतारीचा नाही बर का तर राणा भीमदेवी थाटातील आवाज कर्णकर्कश व्हायला काहीसा अवधी असला , तरी या देशातील अनेक लिब्रांडू पत्रकारांनी आपला पक्षकारच बदलून आता भाजपची बिनपगारी वकिली करण्याची स्पर्धा त्यांच्या त्यांच्यात लावली असल्याचे दिसते. परिणामी त्यामुळे काॅंग्रेसच्या पायाखालची वाळू इतक्या रसातळाला जाईल की त्यांच्या खासदारांची संख्या चाळीस सुध्दा गाठणार नाही .
वास्तविक या पक्षाचे खरे वारसदार पप्पूंच वय देखील पन्नाशी होऊन गेल आहे त्या पक्षाची दुरावस्था तर दुसरीकडे त्यांचे आजचे साथीदार शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वयाचा हिशोब लागायचा तेंव्हा लागेल पण उबाठाच्या फाटक्या वाकळेत बोट नाहीतर चक्क पाय घालून महाराष्ट्रातील काॅंग्रेसच्या नेत्यांनी या वाकळेतून आपली तर अवकात जशी जग जाहिर केली तशीच अवकात शिल्लक शिवसेनेचे खासदार व विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी सतरा पडिक उमेदवारी आज जाहीर केली .
सध्या महाविकास आघाडीच्या राजकारणाच दुकान हे याचा माल त्याच्याकडून आणून तो तिसऱ्याला चढ्या भावाने द्यायचा व त्यातून मिळालेली दलाली आप आपसात वाटून खायची असा सगळा चोरीचा मामला असला तरी हा मामला हळूहळू बोंबला सारखा झाला आहे , मग यातून वंचितांच्या प्रकाश आंबेडकर यांनी अगदी गंमतीदार मनोज जरांगे पाटील यांच प्यादे उभारून आपली सर्कस उभारली आहे. पण निवडणुकीनंतर या सर्कशीतल्या वाघांची शेळी झाल्याने सगळे एकजात महाविकास आघाडीच्या कळपात शेपट्या घालून सामील होतील याबाबत माझं व्यक्तिगत भाकीत आहे. ते किती खरं ठरतं हे येणारा काळच ठरवेल. पण राजकारणात कोण कोणाची कोणच्या खलबत्याचा वापर करून कोणाच्या आडोशाचा वापर करून कशी ठेचतो हे सगळं अनाकलनीय आहे. त्यामुळे त्यालाच तर राजकारण म्हणतात , म्हणून त्या भानगडीत शहाण्यांनी कधीच पडू नये वाटल्यास दोन दोन हाणा अन् निपचित पडून रहा किमान त्यातून मनस्वी हृदयापासून शांतता तर मिळते शिवाय लोकसभा निवडणूक म्हटल्या की त्यासाठी लागणारे पन्नास शंभर हजार कोटी रुपये आणणारं कुठून नाही का ॽ तर हां आपला प्रांत नाही परिणामी जसं मला सुचलं तसं आम भाषेत लिहीत गेलो .
तर सांगायचा मुद्दा असा की खासदार संजय राऊत यांनी शिल्लक शिवसेनेच्या सतरा पडिक मर्द उमेदवांराची नावे जाहीर केली. तर या नावात त्यांनी ऐनवेळी राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांच नाव घुसवल ते स्वहस्ते यामुळे काॅंग्रेसच्या नेत्यांनी महाआघाडीतील हवाच हवाई हवाई करून टाकली कारण मुंबईतील हा
दशअवतारी मतदारसंघ हा काॅंग्रेसचे दोन वेळा माजी खासदार असलेल्या स्व. एकनाथ गायकवाड यांचा त्यामुळे तो सहाजिकच काॅंग्रेसचा परिणामी गायकवाड यांच्या कन्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांचा पण त्यांचा नाहक बळी घेतला गेला. वास्तविक हिंमत होतीच तर मर्द म्हणून केवळ अर्धा मताने राज्यसभेचे खासदार झालेले व आता मिनमिनत्या दिव्यात फडाफडा दुसऱ्याला शहाणपणा शिकवणाऱ्या खासदार संजय राऊतांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन आपली उमेदवारी जाहीर करायला हवी होती. पण या मतदारसंघातून जशी ती अनिल देसाई यांची अनामत वाचणार नाही तशी ती राऊतांची काय गाजर वाचवणार का ॽ कारण इथं आता काॅंग्रेस उबाठाला गाजरं खायला देणार .
दुसरीकडे शिल्लक शिवसेनेत मातोश्री सोडून दुसरा कोणी मर्द असावा की नको ? म्हणून जर विचारणा झाली तर त्यांनी त्यावर डब्बल महाराष्ट्र केसरी झालेला पैलवान पाटील यांना सांगलीच्या मैदानात शडडू ठोकायला लावले आहे. अर्थात ही सारी खेळी शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आहे. कारण यापुढील काळात सांगलीच्या राजकारणात प्रतिक या सुपुत्राला पुढे आणण्यासाठी जयंत पाटील यांनी शिल्लक शिवसेनेच्या माध्यमातून काॅंग्रेसच्या वर्षानुवर्षे हक्काची जागा आपसूक काढून घेत तेथे स्व.वसंतदादा पाटील यांच्या नातवावर अर्थात विशाल पाटील यांच्यावर अन्याय केला (अर्थात स्व.वसंतदादा पाटील आणि स्व.राजारामबापू पाटील यांच्यातील पिढीजात आहे अर्थात त्यावर बोलण्यासारखे भरपूर आहे ) त्यामुळे सैरभैर झालेल्या काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘ नो विशाल नो मशाल ‘ असा जोरकस नारा देऊन डब्बल महाराष्ट्र केसरीचे मैदान मारणाऱ्या या पाटलांची पाट राजकीय आखाड्यात भुईला टेकवायचा पणच केलाय .
या दोन मतदारसंघावर शिल्लक शिवसेनेने निवडणूकपूर्व कुरघोडी केली तरी ‘ गोत्याचा पाय नेहमीच खोलात ‘ हे विसरून कसे चालणार तर आता राहिला प्रश्न उर्वरित उमेदवारांचा त्यातील एकतर तो अमोल किर्तीकर की ज्याला आजच ईडीने कोरोना काळात खिचडी घोटाळ्यात डबरा घातल्याचा आरोप आहे म्हणून समन्स बजावले आहे. मग उर्वरित कोकणात ज्यांना 🌃 रात आंधळा असणारा म्हणून हिणवतात तो तर दुसरे मातोश्रीवर झाडलोट करून आपली रोजीरोटी अरविंद नावाचे सद्गृहस्थ . बाकी सगळे हैद्राबादी त्यात हडेलहप्पी औरंग्या तर हे सगळेच हरणार म्हणजे हरणार . आता पुढचे पाच नवे दर्द म्हणजे मर्द कधी येतात का देतात ते पाहू तोपर्यंत धन्यवाद.
राजाभाऊ त्रिगुणे
सातारा
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक