श्रीमती सोनी कानडे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

श्रीमती सोनी कानडे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
माळशिरस प्रतिनिधी दिनांक 27/3/2024 :
पंचायत समिती शिक्षण विभाग माळशिरस यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्यात श्रीमती सोनी प्रभाकर कानडे यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कादर शेख (शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर), विनायक गुळवे (गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी)पंचायत समिती माळशिरस), प्रदीपकुमार करडे (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माळशिरस), किरण मोरे (सहाय्यक गट विकास अधिकारी पं. स.माळशिरस),गटशिक्षणाधिकारी बार्शी सुहास गुरव, अजिंक्य खरात (गटशिक्षणाधिकारी इंदापूर), यांच्या शुभहस्ते जि. प. प्रा. आदर्श कन्या शाळा माळशिरसच्या उपशिक्षिका श्रीमती सोनी प्रभाकर कानडे यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शैक्षणिक वर्ष सन 2021 -22 साठी त्यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. श्रीमती सोनी कानडे यांनी शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे .एक विद्यार्थी प्रिय उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्या परिचित आहेत .
यापूर्वीही शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात अनेक पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत ..
त्यांच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे ,केंद्रप्रमुख सौ उज्वला प , शाळा व्यवस्थापन समिती ,पालक वर्ग व त्यांचे पती , शिवलिंग गुमे ,त्यांचा परिवार व तालुक्यातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन कौतुक केले.