उध्दव ठाकरेंना आता ‘ आई तुळजाभवानी ‘ ची आठवण झाली का ॽ

उध्दव ठाकरेंना आता ‘ आई तुळजाभवानी ‘ ची आठवण झाली काॽ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 09/03/2024 :
आजपर्यंत जे पेरलं ते कुठं गेलं ? का ते म्हसणात गेलं ? का होता त्यावेळी गप्प , कुठ पेंड खात होता तुमचा लुच्छा स्वाभिमान , का नाही आठवला तुम्हाला मतदान करणारा जातिवंत ब्राह्मण जो तुम्हाला सतत जणयुधारी दिसतो , आता मात्र हेच उध्दव ठाकरे एकजात सगळे सत्तेच्या सारीपाटावर किडे मकोडे खाऊन एकत्रितपणे सुस्तावलेले दिसतात . याला काय म्हणायचे म्हणून तुम्ही काल बोलता बोलता बोलून शाब्दिक निशस्त्र झालात कारण तुमच्या वाणीत ज्यावेळी तुमचीच नाही तर आम्हा हिंदूंची ‘ आई तुळजाभवानी ‘ मातेच्या दर्शनासाठी जाताना याच आईची खोटी शपथ घेत तुम्ही आमचं ऊर फाडल पण तो निवडणुकीतील प्रचाराचा खोटारडेपणा होता त्यामुळे तुम्ही घरच्या चुलीवर शेकोटी करत बसला आहात .
काय तर म्हणतात की देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बंद दालनात शिवसेनेला अडीच वर्षांच मुख्यमंत्रीपद देऊ असा मला शब्द दिला होता पण निवडणुकीच्या निकालानंतर या दिलेल्या शब्दाला अमित शहा जागले नाहीत म्हणून आम्हाला शरदचंद्र पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह काॅंग्रेस पक्षाबरोबर घरोबा करावा अशी लोणकढी थाप शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल व आज एका प्रचार सभेत मारली , वास्तविक ही निव्वळ थापच नाही तर तो खोटारडेपणा असताना शिवसेनेचे प्रवक्ते व मुख्यमंत्र्यांचे खंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे यांची तळी उचलत हो अमित शहा यांनी तसा शब्द उध्दव ठाकरे यांना दिला होता पण पहिल्या अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद हे भाजपला मिळणार होते तथापि ते ठाकरे यांच्या पचनी पडत नव्हते म्हणून त्यांनी शरदचंद्र पवारसाहेब यांनी देऊ केलेल्या पाच वर्षांचे मुख्यमंत्रीपद स्विकारण्याचा आततायीपणा करणारा घातकी निर्णय घेतला असे सांगून शिरसाटांनी आपल्या अकलेचे दिवाळे काढले आहे .
वास्तविक आमदार संजय शिरसाट यांना शिवसेना फुटी पूर्वी कोणताही राजकीय भाव शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही पण आता या फुटीनंतर शिरसाट मात्र भलतेच फाॅर्मात आलेले आहेत म्हणून त्यांनी अमित शहा यांनी दिलेल्या कथित शब्दाला फोडणी देऊन ठाकरे यांची तळी का उचलली आहे हे कळायला काही मार्ग नाही , पण वेळप्रसंगी उध्दव ठाकरे यांची शिल्लक शिवसेना जर यदाकदाचित राजकीय सौदेबाजी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या शिवसेनेत एकवटली तर आपलं राजकीय अस्तित्व असावं असाच काहीसा हेतू यामागे शिरसाटांचा असावा त्यात दुसरे बिनबुडाचे भाईगिरीत मश्गूल असणारे माजी मंत्री रामदास कदम यांनी तर कोकणातून भाजपलाच शिवसेना संपवण्याची घाई झाली असल्याचा जावई शोध लावून उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा पराक्रम केला आहे तरीही या कदमांना कुणीही कदमतालावर चालायला सांगत नाही त्यामुळे त्यांची काय किंवा वयो परत्वे मोडीत निघालेल्या खासदार गजानन किर्तीकर यांचे आदळ आपट करणारी निष्क्रिय विधाने कुणीही मनावर घेत नाही , वास्तविक शिवसेनेतील असली खोगीरभरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी काय सहन करतात हे देव जाणे नाही तर दुसरं काय ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जे चाळीस आमदार व तेरा खासदार आहेत त्यापैकी बहुतांश लोक केवळ राजकीय मलई कशी मिळेल याकडे डोळे लावून बसलेले असतात हे काय नव्याने सांगण्याची गरज नाही त्यामुळे या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर यातील बहुतेक खासदार व आमदारांचे आपसूकच विसर्जन होणार आहे तोपर्यंत अशा तकलादू मंडळींना नमस्कार करण्यावाचून दुसरा पर्याय नाही , हां आता राहता राहिला प्रश्न तो असा की जर उध्दव ठाकरे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बंद दालनात अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद देणार असल्याचा शब्द दिला होता तर संपूर्ण विधानसभा निवडणुकीतील प्रचारात झालेल्या जाहीर सभेत या विषयी एक चकार शब्द ठाकरे यांनी का काढला नाही ? का त्यावेळी त्यांच्या तोंडात दही जमा झाल्याने त्यांना तोंडच उघडता येत नव्हते , तसेच समजा ऐनकेन प्रकारे जर उध्दव ठाकरे यांनी या प्रचाराच्या धबडग्यात असा कोणताही शब्द उच्चारला नसेल तर त्यांनी निवडणूक निकालानंतर तरी देवेंद्र फडणवीस यांनी पाच-पंचवीस वेळा फोन करून सत्तेची चाचपणी करण्याचा एकतर्फी प्रयत्न केला त्याला प्रतिसाद देत ठाकरे यांनी अमित शहा यांनी जो सत्तेचा शब्द दिला होता त्याविषयी का फडणवीस यांच्याकडे कोणतेच सुतोवाच का केले नाही , याचा अर्थ सरळसरळ असा होतो की ठाकरे यांना भाजपसोबत कोणतीही सत्ता स्थापन करायची नव्हती कारण ते तोपर्यंत शरदचंद्र पवारसाहेब यांच्या हातातील चक्क बाहूले झाले हे कसे नाकारून चालेल त्यामुळे आगामी काळात तरी भाजपच्या दिल्ली स्थित नेत्यांनी उध्दव ठाकरे यांच्या गळाला लागण्याचे पाप करून महाराष्ट्रातील मतदारांचा अवमान करून आपली फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा हेच मतदार भाजपला दिवसाढवळ्या चांदणे दाखवतील यात काही शंका नाही .
राजाभाऊ त्रिगुणे
सातारा .
दिनांक -०८/०३/२०२४ .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक