बेशिस्त कर्मचाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई व शिस्तभंग कायद्याअंतर्गतच कारवाईची मागणी

बेशिस्त कर्मचाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई व शिस्तभंग कायद्याअंतर्गतच कारवाईची मागणी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 09/03/2024 :
उपविभागीय अधिकारी यांच्या पत्राचा आदर ठेवून अकलूज नगरपरिषदचे मुख्याधिकारी दयानंद गोरे हे संबंधित 3 बेशिस्त कर्मचाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई व शिस्तभंग कायद्याअंतर्गतच कारवाई करून त्यांच्या सेवा पुस्तकेत नोंद घेणार का? असा प्रश्न पश्चिम भारत
अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी उपस्थित केला आहे.
अकलूज नगरपरिषद मध्ये बांधकाम विभागात कार्यरत असलेले बेशिस्त कर्मचारी आनंद जाधव, नितीन काकडे, नितीन पेटकर इतर विभाग यांच्या वरती दि 10/10/2023 रोजी दफ्तर दिरंगाई व शिस्तभंग कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी अकलूज नगरपरिषदचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना अर्ज दिला होता. अद्यापही अर्जावरती दप्तर दिरंगाई व शिस्तभंगाची कोणतीही कारवाई केली नाही व संबंधित कर्मचारी यांच्या सेवा पुस्तके नोंद घेतल्या गेले नाही. सदर दिलेल्या अर्जाचा पाठपुरावा करत असताना मुख्याधिकारी यांनी संबंधितांना तात्काळ खुलासा सादर करण्यास सांगितले असताना तिथे ही ह्या बेशिस्त कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक वेळ काढूपणाकरून वेळेत खुलासा सादर केला नाही. मी सतत पाठपुरावा केल्याने मग संबंधित कर्मचारी यांनी 15 दिवसांनी खुलासा सादर केला. वरील मागणी प्रमाणे संबंधित कर्मचारी अनंत जाधव, नितीन काकडे बांधकाम विभाग व नितीन पेटकर इतर विभाग हे दफ्तर दिरंगाई व शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असतातना अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे हे जाणीवपूर्वक संबंधित कर्मचारी यांना वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत. वेळोवेळी मुख्याधिकारी यांना या कारवाई संबंधित भेटलो असताना मुख्याधिकारी यांनी आज उद्या चालढकल करत मागील 5 महिने वेळ काढू पण केला आहे. जर अकलूज नगरपरिषदचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी संबंधितावरती कारवाई करून सेवा पुस्तके नोंद न घेतल्यास लवकरच अकलूज उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय समोर सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इषारा सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता आणि aklujvaibhav.in ला दिली.