ताज्या घडामोडी

“माझ्याकाळात कामे जास्त पण भाषणे कमी झाली”: संग्रामसिंह मोहिते पाटील

“माझ्याकाळात कामे जास्त पण भाषणे कमी झाली”: संग्रामसिंह मोहिते पाटील

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 29/02/2024 :
“माझ्याकाळात कामेच जास्त झाली पण भाषणे कमी झाली. बोलण्यापेक्षा काम करण्यावरच मी जास्त भर दिला आहे.” असे विचार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. कृष्ण प्रिया इन्फोसिस व इंग्लिश स्पोकन व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सचे उद्घाटन संग्रामसिंह मोहितेपाटील  व सौ. ऋतुजादेवी संग्रामसिह मोहिते -पाटील (सभापती श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील हायस्कूल कोथरूड पुणे) या उभयतांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. ते कोणत्याही कार्यक्रमाला वेळ देताना मी भाषण करणार नाही हे सांगूनच वेळ देतात पण त्यांच्या मनात अंधारे परिवाराच्या विषयी असलेलं प्रेम त्यांना आज भाषण करण्यास परावृत्त करुन गेले आणि त्या प्रेमापोटी ते अतिशय सुंदर विचार मांडत गेले सर्वच उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या भाषणाला दाद दिली.
दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अकलूज येथे नितीन कम्युनिकेशन च्या कार्यालयासमोर संपन्न झालेल्या छोटेखानी परंतु नेटक्या नियोजनात बहारदारपणे संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्या समयी आपल्या प्रास्ताविक मनोगतामध्ये सुमित्रा नागरी पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे म्हणाले की बाळदादांनी ग्रामपंचायत सरपंच असताना छोट्याछोट्या व्यवसाईकांना त्यांचे व्यवसाय चांगल्या प्रकारे करता यावेत म्हणून २२०० गाळे बांधले त्या ठिकाणी आज २२०० गाळेधारक प्रत्येक दुकानात २ कामगार अशा ६ हजार सहाशे कुटुंबाला आधार दिला. त्या घरांमध्ये सुखाचे दिवस आणलेत. अगदी पहिल्यांदा १९८५ साली सुरू केलेल्या घड्याळ दुरुस्ती पासून आधुनिक युगात कॅम्पुटर व स्पोकन इंग्लिश चालू केले. त्याचा सर्वानी फायदा करून घ्यावा. बाळदादानी केलेल्या मदतीला माझ्या श्वासात श्वास असेपर्यन्त मी आणि माझा परिवार कधीच विसरू शकणार नाही. तसेच सुयश संजय वाघमोडे (इयत्ता ८ वी),ने त्याच्या भाषण कलेतून सर्वांना मोटिवेट केले त्याने सांगितलेकी यशस्वी होण्यासाठी आपण भितीवर मात केली पाहिजे संकटाना सामोरे गेले पाहिजे विजय मिळवणे आपल्याच हातात असते अतिशय सुरेख भाषणातून त्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

प्रारंभी प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा अंधारे परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान सोहळा संपन्न झाला. संजय वाघमोडे यांनी स्पोकन इंग्लिश विषयांचं महत्त्व वेगवेगळ्या उदाहरणांतून समजावून सांगितले ते म्हणाले की स्पोकन इंग्लिश क्लास साठी कुठलीही वयाची अट नाही लहानान पासून ते थोरान पर्यंत सर्वांनाच हा स्पोकन क्लास करता येतो आणि या स्पर्धेच्या युगात आपण स्वतःला काळानुसार बदलवणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमासाठी स.म.शंकरराव मोहिते पाटील सूतगिरणीचे संचालक दिपकराव खराडे पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुभाष दळवी, नारायण फुले, उत्कर्ष शेटे, सुमित्रा बँकेचे व्हाईस चेअरमन जावळे अण्णा, जगन्नाथराव धुमाळ, श्रीमती वसुंधरा देवडीकर साप्ताहिक अकलूज वैभव व पाक्षिक वृत्त एक सत्ता चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख व प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी अर्थात पिचडा आयोग दिल्ली), पत्रकार राजू मुलांणी, ॲडव्होकेट जाधव, ॲडव्होकेट रणजीत देशमुख, आप्पासाहेब मगर, जगदाळे पाटील, इ.अनेक मान्यवर उपस्थित होते. आभार कृष्णप्रिया इनफोसेस चे प्रेसीडेंट नितेश अंधारे यांनी मानले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button