ताज्या घडामोडी

शिवरत्न पॅटर्नच्या माध्यमातून स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जिंकण्याची सवय लागली ; शितलदेवी मोहिते-पाटील

शिवरत्न पॅटर्नच्या माध्यमातून स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जिंकण्याची सवय लागली : शितलदेवी मोहिते-पाटील

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 23/02/2024 :
शिवरत्न पॅटर्नच्या माध्यमातून स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जिंकण्याची सवय लागली असे विचार शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांनी व्यक्‍त केले. 10वी आणि 12वी च्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा’ या निर्णायक वळणावर करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यासाठी शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील व अध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार शिवरत्न पॅटर्नच्या वतीने इ.१० वी मधील विद्यार्थ्यांसाठी “शिवरत्न टॅलेंट सर्च परीक्षा 2024” आयोजित करण्यात आली होती. शुक्रवारी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. या वेळेस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रथम क्रमांक : कु. युगंधरा प्रेमनाथ रामदासी, चि. पृथ्वीराज दत्तात्रय माने देशमुख.
द्वितीय क्रमांक : कु. श्रेयाली अभयसिंह रणनवरे, चि. ओम सुरेश बिचकुले.
तृतीय क्रमांक : कु. मंजिरी अनुप इनामके, चि. आदित्य गणेश कोरटकर
उत्तेजनार्थ : कु. शिवांजली धनाजी पवार, कु. आरसीया समीर कलाल,
कु. मानसी उमेश गायकवाड, चि. श्रेयश स्वानंद पवार, चि. प्रणव निलेश बुगड.
सदर कार्यक्रमासाठी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शितलदेवी मोहिते पाटील, सचिव धर्मराज दगडे, संचालक डॉक्टर विश्वनाथ आवड , श्रीकांत राऊत, अश्रफ शेख, प्राचार्य अल्बर्ट थरकन, समन्वयक राजकिरण माने व इतर मान्यवर उपस्थित होते.
या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास १०,०००/- रुपये, द्वितीय क्रमांकास ७०००/- रुपये, तृतीय क्रमांकास ५०००/- रुपये तर उत्तेजनार्थ पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०००/- रुपये व प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. “शिवरत्न” पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्याचे काम होत असल्याबद्दलची चर्चा पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button